Headlines

सीईओ गांधींचे 23 ग्रामपंचायतींना मार्गदर्शन:विकासकामांमध्ये गुणवत्ता, वेळेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी तालुक्यातील विकासकामे विहित मुदतीत, दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ग्रामविकासात लोकसहभाग, स्वच्छता, गुणवत्तापूर्ण सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. संत गाडगेबाबा उन्नत ग्राम अभियान अंतर्गत चांदूर बाजार पंचायत समितीच्या सभागृहात तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली…

Read More

दर्यापूर कृउबास सभापतींविरोधात अविश्वासाची तयारी:18 पैकी 12 संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र

दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू झाली आहे. १८ पैकी १२ संचालकांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठरावासाठी बैठक घेण्याची मागणी करणारे पत्र दिले आहे. शुक्रवारी सायंकाळी डीपीसीची बैठक संपल्यानंतर हे पत्र सादर करण्यात आले. यामुळे दर्यापूरच्या राजकीय वर्तुळात सध्या वेगवान हालचाली सुरू आहेत. बाजार…

Read More

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू:दर्यापूर तालुक्यातील हुसेनपूर शेत शिवारात घडली घटना

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील हुसेनपूर (कान्होली) शेत शिवारात विजेचा धक्का लागून एका ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, १९ जुलै रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. जीवन नारायण डवंगे (वय ३० वर्षे) असे मृत युवकाचे नाव आहे. जीवन डवंगे नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेला होता. या परिसरात वन्य प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असल्याने शेताचे…

Read More

प्रियांका चोप्राच्या वाढदिवसानिमित्त पती निकची खास पोस्ट:स्पॅनिशमध्ये लिहिले- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा; स्पेनमध्ये याटवर सुट्टीचा व्हिडिओ शेअर केला

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा 18 जुलै रोजी 44 वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसाच्या एक दिवसानंतर, तिचा पती आणि गायक निक जोनासने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये प्रियांका स्पेनमध्ये एका याटवर सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. दरम्यान, प्रियांकाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आगामी ‘वाराणसी’ चित्रपटातील तिचा पहिला लूकही प्रदर्शित करण्यात…

Read More

आदिवासी विकास योजनांमध्ये रस्ते, वीज, आरोग्याला प्राधान्य द्या:मंत्री उईके यांचे चिंतन बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश

आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी आदिवासी क्षेत्रातील आरोग्य, पोषण, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या प्रभावी अंमलबजावणीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. चिखलदरा येथील आरोग्य विभागाच्या तालुका प्रशिक्षण केंद्रात आयोजित विविध विभागांच्या चिंतन बैठकीत (आढावा सभा) ते बोलत होते. या बैठकीत मंत्री उईके यांनी प्रत्येक विभागाचा सविस्तर आढावा घेतला….

Read More

शिक्षकांच्या आंदोलनापुढे सरकार नमले:टीईटीबाबत फेरविचार शक्य; शिक्षणमंत्र्यांसोबत पदाधिकाऱ्यांची बैठक

शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) मुद्द्यावर राज्यभरात झालेल्या शिक्षक संघटनांच्या आंदोलनानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत टीईटीबाबत फेरविचार करण्याच्या शक्यतेवर आणि शिक्षकांच्या इतर प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले की, इतर राज्यांमध्ये लागू असलेल्या नियमांचा आणि कार्यपद्धतीचा अभ्यास करून महाराष्ट्रातही टीईटी परीक्षेची काठिण्य…

Read More

सरकारी कार्यालयांमध्ये विजेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय:गरज नसताना दिवे, पंखे, एसी सुरू; राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान

अमरावती शहरातील अनेक सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये विजेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याचे समोर आले आहे. कामासाठी येणाऱ्या नागरिकांनी ही बाब निदर्शनास आणली असून, कर्मचारी संघटनांच्या काही पुढाऱ्यांनीही यावर चिंता व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि महापालिका यांसारख्या लोकाभिमुख कार्यालयांमध्ये ही परिस्थिती वारंवार दिसून येते. केवळ या तीन कार्यालयांपुरती मर्यादित नसून, इतरही अनेक…

Read More

'भाजपचा DNA आता ओबीसींचा राहिला नाही, कारखानदारांचा झालाय':लक्ष्मण हाकेंचा घणाघात; नव्या राजकीय पक्षाचीही केली घोषणा

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी जनता पार्टी या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याची मोठी घोषणा केली आहे. आगामी काळात ओबीसी समाजाचे सक्षम प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण याच पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती खुद्द लक्ष्मण हाके यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. लक्ष्मण हाके यावेळी बोलताना म्हणाले की, भाजपचा डीएनए हा ओबीसी राहिला नाही,…

Read More

रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने महिलेची खाजगी वाहनातच प्रसुती:औंढा नागनाथ तालुक्यातील प्रकार, आरोग्य यंत्रणेच्या कामाचे पुन्हा एकदा वाभाडे

जवळा बाजार येथे रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याने एका अर्भकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची चौकशी अद्यापही सुरुच असतांना रविवारी (ता. 19) पुन्हा एक प्रकार समोर आला आहे. औंढा तालुक्यातील काशीतांडा येथील एका गर्भवती महिलेला वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने खाजगी वाहनातून हिंगोलीकडे आणताना वाहनातच प्रसुती झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले आहे. हिंगोली जिल्हयात…

Read More

स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा संसदेत मांडा:'विराआस'ने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दिले निवेदन

विदर्भ राज्य आंदोलन समिती (विराआस) च्या शिष्टमंडळाने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. आगामी लोकसभा अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा संसदेत मांडावा आणि विदर्भाची त्वरित निर्मिती करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. हे निवेदन १९ जुलै रोजी देण्यात आले, तर लोकसभा अधिवेशन २० जुलै २०२६ पासून सुरू होत आहे. यावेळी ‘विराआस’चे पूर्व विदर्भ…

Read More