Headlines

अनंत अंबानींचा 31वा वाढदिवस-जामनगरच्या सर्व गावांना भोज:1 लाख गायींना छप्पन भोग; शाहरुख-रणवीरसह अनेक सेलेब्रिटींचा सहभाग, PHOTOS

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र, अनंत अंबानी, आज आपला ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगाचे औचित्य साधून, गुजरातमधील जामनगर येथे एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे; ज्यामध्ये उद्योगजगतातील अनेक नामवंत व्यक्ती—तसेच बॉलिवूडमधील तारे-तारका—सहभागी होण्यासाठी आधीच दाखल झाले आहेत. गुरुवारी, अनंत यांनी जामनगर येथे ‘गो-सेवा’ (गायींची सेवा) केली. त्यांनी १,००,००० हून…

Read More

महसुलच्या धडक कारवाईने रस्त्याचा वाद आला संपुष्टात:मोर्शी तालुक्यातील कोपरा-अहमदपूर काम युद्धपातळीवर‎

तालुक्यातील मौजे कोपरा आणि मौजे अहमदपुरच्या सीमेवरील गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला एका क्लिष्ट पाणंद रस्त्याचा वाद संपुष्टात आला आहे. मोर्शीचे तहसीलदार सागर ढवळे व महसूल प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्थीमुळे यातून योग्य मार्ग निघाला. सध्या रस्त्याचे बांधकाम सुरु असून परंपरागत रस्ता मोकळा झाला आहे. प्रशासनाच्या या गतीमान कारवाईमुळे स्थानिक शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला असून तहसीलदार आणि…

Read More

सातबारा दुरुस्तीपासून ते शेतरस्त्यांपर्यंत:महसूल शिबिरातून बळीराजाला दिलासा, राहात्यात समाधान‎ शिबिराद्वारे विविध ‎दाखल्यांचे वितरण‎

महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा क्रमांक- १ अंतर्गत महसूल विभागाच्या राहाता मंडलाच्यावतीने विविध विभागीय शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना प्रांत अधिकारी माणिक आहेर व तहसीलदार अमोल मोरे यांच्या उपस्थितीत दाखल्यांचे वाटप करण्यात आले. साई विठ्ठला लॉन्समध्ये शिबीर आयोजित केले होते. यावेळी मुख्याधिकारी वैभव लोंढे, उपनगराध्यक्ष डॉ. विजय सदाफळ, नायब तहसीलदार बाळासाहेब…

Read More

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!:तूर आणि हरभरा खरेदीला केंद्राची मुदतवाढ, पणनमंत्री जयकुमार रावल यांची माहिती

राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाने खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच हरभरा खरेदीत आणखी 58 हजार 632 मेट्रिक टन वाढ केली असून आता राज्यात 8 लाख 19 हजार 882 मेट्रिक टन हरभरा खरेदी करता येणार असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण…

Read More

दिल्लीतील आगीच्या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू, 11 परदेशी:हॉटेल मालकाला अटक, कुटुंबासह अडकलेल्या सीएने फोनवर सांगितले होते- कदाचित वाचणार नाही

दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर येथील फ्लोरिश स्टे हॉटेलमध्ये बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत 21 लोकांचा बळी गेला. या हॉटेलला 6 खोल्यांची परवानगी होती, पण 5 मजल्यांवर 25 पेक्षा जास्त खोल्या बांधल्या होत्या. हॉटेलकडे फायर NOC (ना हरकत प्रमाणपत्र) नव्हते आणि येण्या-जाण्यासाठी एकच मार्ग होता. मृतांमध्ये 11 परदेशी आणि 10 भारतीय आहेत. परदेशी नागरिकांमध्ये 9 आफ्रिकन देशांचे…

Read More

CBSE Revaluation Application Glitches | Students Stressed Over Last Date

लेखक: उन्नति झाबक10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सीबीएसईने 19 मे पासून उत्तरपत्रिकेच्या स्कॅन केलेल्या प्रतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली. याची अंतिम तारीख 23 मे निश्चित करण्यात आली होती, परंतु तांत्रिक अडचणींमुळे वेबसाइट गेल्या 5 दिवसांपासून सतत क्रॅश होत आहे. बोर्डाचे अध्यक्ष राहुल सिंह यांनी सांगितले होते की, वेबसाइटवर अनधिकृतपणे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे विद्यार्थ्यांची…

Read More

कोणालाही खबर नाही, एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठली:अमित शहांसोबत बंद दाराआड बैठक; गुप्त दिल्ली दौऱ्याने राजकारणात खळबळ

राज्यात विधान परिषद निवडणुकांच्या जागावाटपावरून महायुतीत हालचाली वेगाने सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुप्त दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. कोणालाही सुगावा लागू न देता एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी राज्यातील बदलत्या…

Read More

महसूल अधिकारी थेट बांधावर; आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन:सेलू येथील बीबीएफ पद्धतीने पेरणीचे प्रात्यक्षिक‎

वाशी तालुक्यातील सेलू येथील ग्राम महसूल अधिकारी डी. व्ही. सिरसावाड पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी थेट बांधावर जाऊन आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन उत्पादन खर्च कमी करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना बीबीएफ (ब्रॉड बेड अँड फरो) अर्थात रुंद वरंबा-सरी पद्धतीने सोयाबीन पेरणी करण्याचे आवाहन केले. सिरसावाड पाटील यांनी केवळ…

Read More

वेरूळ घाटातील ‘चांगोबा’ वळणावर 2 बसची धडक:अर्धा तास वाहतूक ठप्प, ट्रॅव्हल्सचालक जखमी‎

वेरूळ लेणीकडे जाणाऱ्या घाटातील ‘चांगोबा वळणा’जवळ गुरुवारी सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान खाजगी ट्रॅव्हल्स आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्मार्ट सिटी बसचा समोरासमोर अपघात झाला. यात ४० भाविक आणि सिटीबसमधील प्रवासी बचावले असून, अपघातात ट्रॅव्हल्सचालक किरकोळ जखमी असून, सिटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडांमध्ये अडकल्यामुळे ४० ते ४५ फूट खोल दरीत कोसळण्यापासून वाचली. कर्नाटकातून…

Read More

राज्यातील रस्त्यांच्या दुतर्फा आता देशी वृक्षांची सावली:नुसती झाडे लावणार नाही, तर जगवण्यासाठी प्रणाली उभारणार- मंत्री भोसले

राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांच्या दुतर्फा होणाऱ्या वृक्षारोपणात स्थानिक हवामान व भौगोलिक परिस्थितीशी सुसंगत देशी प्रजातींच्या वृक्षांना प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. वृक्षारोपणासोबतच वृक्षांचे संगोपन, संरक्षण आणि संवर्धनावर शासन विशेष भर देणार असून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचा सहभागही वाढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हवामान बदल, वाढते…

Read More