बँकॉकहून सौंदर्य प्रसाधनांच्या डब्यातून आणले 1 कोटीचे चरस:पुणे विमानतळावर महिला जेरबंद, तब्बल 1 किलो 243 ग्रॅमचा मुद्देमाल जप्त
सौंदर्य प्रसाधनांच्या आडून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका महिलेला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून तब्बल १ कोटी रुपये किमतीचे चरस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई केंद्रीय सीमा शुल्क विभाग आणि महसूल गुप्तचर यंत्रणेच्या संयुक्त पथकाने केली. बँकॉकहून आलेल्या या महिलेने सौंदर्य प्रसाधनांच्या डब्यातून चरस आणल्याची गोपनीय माहिती कस्टम आणि डीआरआयच्या पथकाला…