Headlines

पाकिस्तानी दहशतवादी नेटवर्कशी संबंधित कर्नाटकातील तरुणाला अटक:व्हॉट्सॲप-इन्स्टाग्रामवर शस्त्र तस्करी आणि विक्रीबाबत संभाषण केल्याचा आरोप

कर्नाटकमधील बिदर येथे दहशतवादी कारवायांच्या आरोपावरून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला तरुण विशाल कुमार मेट्रे (24) पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी शहजाद भट्टी, राणा हनैन आणि नोमी खान यांच्या संपर्कात होता. गुप्तचर माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विशाल हा बिदरमधील भालकी तालुक्यातील येनकूर गावचा रहिवासी आहे. तो व्हॉट्सॲप आणि…

Read More

पुण्यात 6500 झाडे लावणार, 500 वृक्षांचे पुनर्रोपण:पुणे मनपा-आनंदवन फाउंडेशनचा उपक्रम; कोथरूड डीपी रोडचा मार्ग मोकळा

पुणे महानगरपालिका आणि आनंदवन फाउंडेशन यांनी संयुक्तपणे वृक्षारोपण व पुनर्रोपणाचा उपक्रम हाती घेतला असून, या अंतर्गत पुण्यात ६,५०० नवीन वृक्षांची लागवड आणि ५०० विद्यमान वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. आनंदवन फाउंडेशनने आपल्या देखरेखीखाली असलेल्या सर्व्हे नं. १८ येवलेवाडी येथील ७ हेक्टर जागेवर वृक्षारोपण व पुनर्रोपणाचे काम करण्यासाठी पुणे महानगरपालिकेला संमती दिली आहे. वृक्षारोपण व पुनर्रोपण…

Read More

ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेसाठी संशोधनाला प्रोत्साहन आवश्यक:विद्यार्थ्यांना संधी दिल्यासच जागतिक बाजारपेठेत स्पर्धा शक्य: डॉ. विवेक सावंत

जगाची नवीन अर्थव्यवस्था ही ज्ञानावर आधारित असून ज्ञान हाच तिचा कच्चा माल आहे. संशोधन, पेटंट आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या बौद्धिक संपत्तीवर आधारित रॉयल्टी ही भविष्यातील अर्थव्यवस्थेची महत्त्वाची ताकद ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी संधी, अत्याधुनिक ज्ञान आणि नवउत्पादनासाठी आवश्यक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. आपली बुद्धिमान मुले परदेशात जाऊन संशोधन करतात आणि त्यातून मिळणारी…

Read More

विक्रम शिंगाडेंवरील विनयभंगाच्या गुन्ह्याने माणमध्ये राजकीय वातावरण तापले:म्हसवड पोलीस ठाण्यासमोर अभयसिंह जगतापांचे ठिय्या आंदोलन

माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे यांच्यासह अन्य आठ जणांविरोधात दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, कोणत्याही राजकीय किंवा अन्य दबावाला बळी न पडता या प्रकरणातील सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, या मागणीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभयसिंह जगताप यांनी म्हसवड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनानंतर…

Read More

उधारीच्या वादाचे रक्तरंजित पर्यवसान; शेंद्रेत तरुणाचा खून:खोऱ्याने डोक्यात घाव; भाड्याने राहणाऱ्या दोघा भावांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जुन्या उधारीच्या पैशांवरून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान शेंद्रे (ता. सातारा) येथे रक्तरंजित हल्ल्यात झाले. सौरभ बाळू भिसे (वय २९) या युवकाच्या डोक्यात खोऱ्याने घाव घालून त्याचा खून करण्यात आला. शनिवारी घडलेल्या या घटनेने शेंद्रे परिसरात खळबळ उडाली. घटनेनंतर सातारा तालुका पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत प्रमोद किसन जाधव व प्रताप किसन जाधव या दोघा भावांना…

Read More

आयटी प्रकल्पांचे आमिष दाखवून 1.85 कोटींची फसवणूक:कंपनी स्वतःची असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांनी फसवले; दोघांविरोधात गुन्हा

आयटी कंपनीला प्रकल्प मिळवून देण्याचे आमिष दाखवत बनावट अॅग्रीमेंट आणि कागदपत्रांच्या आधारे दोघांची एक कोटी ८५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली आहे. कंपनी स्वतःच्या मालकीची असल्याचे भासवून भागीदारीत कंपनी स्थापन करण्यास आणि मोठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रवीण दत्तू शेळके आणि निता प्रवीण शेळके…

Read More

Loha District Marathi Literature Conference 2026

मराठवाडा साहित्य परिषद, शाखा नांदेड आणि डी. के. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे जिल्हा मराठी साहित्य संमेलन शनिवार, 10 ऑक्टोबर 2026 रोजी लोहा येथे आयोजित करण्यात आले आहे. स्व. माजी खासदार भाई डॉ. केशवराव धोंडगे यां . सायाळ रोडवरील डी. के. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या परिसरात होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ…

Read More

एअर चीफ मार्शल म्हणाले- तेजसच्या वितरणाला होणारा विलंब आमचे नुकसान:हवाई दलाला दरवर्षी 36-40 फायटर जेट्सची गरज; विद्यमान स्क्वॉड्रनची संख्या घटून 29 झाली

एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी शनिवारी सांगितले की, तेजस लढाऊ विमानांचा समावेश करण्यास होत असलेल्या विलंबामुळे भारतीय हवाई दलाचे नुकसान होत आहे. सध्याच्या परिस्थितीत आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हवाई ताकद अत्यंत आवश्यक होत चालली आहे आणि हवाई दलाकडे लढाऊ विमानांच्या स्क्वॉड्रनची संख्या कमी होत आहे. एअर चीफ म्हणाले की, हवाई दलाला पुढील काही वर्षे दरवर्षी…

Read More

राजना पूर्णा धरणाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी तीन महिन्यांचा अल्टीमेटम:मंत्रालयात बैठक घेऊन पुनर्वसन आणि भूसंपादनाला गती देण्याचे निर्देश

चांदूर बाजारमधील राजना पूर्णा बैरेज प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तीन महिन्यांत शासनाकडे सादर करण्याचा अल्टीमेटम दिला. आमदार प्रवीण तायडे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्देश दिले. यावेळी राजुरा गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाकडे पाठवण्याची सूचना केली. तसेच, राजुरा बृहत् लघु प्रकल्पासाठी मंजूर २५ कोटी रुपयांचा निधी भूसंपादनासाठी वापरून प्रक्रिया…

Read More

ऊसदरवाढीसाठी नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा एल्गार:पहिली उचल 4 हजार रुपये प्रतिटन देण्याची मागणी; काटामारी, ऊसतोडणी व वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकतेसाठी आंदोलनाची हाक

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला योग्य व न्याय्य दर मिळावा, यासाठी नांदेड जिल्ह्यात व्यापक शेतकरी आंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला. उमरी तालुक्यातील इज्जतगाव येथील भवानी मंदिरात झालेल्या शेतकरी बैठकीत पंचक्रोशीतील शेकडो ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले. बालाजी गाडे पाटील आणि भगवान पाटील मनुरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत ऊसदरासह वजनकाटा, ऊसतोडणी, वाहतूक आणि ऊसतोड कामगारांच्या विविध…

Read More