आजारी बाळाला कडेवर घेऊन 3 तास पायी चालली आई:10 किमीचा प्रवास, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी चिमुरड्याचा मृत्यू; मेघालयातील घटना
मेघालयातील वेस्ट खासी हिल्स जिल्ह्यातील डोमकिरकोह गावात शुक्रवारी एका आजारी मुलाचा त्याच्या आईच्या कुशीतच मृत्यू झाला. खराब रस्त्यांमुळे कोणतेही वाहन गावात येण्यास तयार नव्हते. कुटुंबीयांनी मुलाला रुग्णालयात नेण्यासाठी रात्रभर वाहनाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. व्यवस्था न झाल्याने आई-वडील दुसऱ्या दिवशी पायी निघाले. कुटुंबीय सुमारे तीन तास पायी चालत १० किमी अंतरावरील मावडेट गावाकडे निघाले; मात्र…