पुण्यात इंग्रजी शिक्षणाच्या भवितव्यावर जागतिक मंथन:‘इएलटीआय’ची आंतरराष्ट्रीय परिषद 7 ते 10 ऑक्टोबरला; एआय, एनईपी 2020 वर चर्चा
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२०, बहुभाषिक शिक्षण आणि बदलत्या अध्यापन पद्धतींच्या पार्श्वभूमीवर इंग्रजी भाषा व साहित्य शिक्षणाच्या भवितव्यावर पुण्यात जागतिक मंथन होणार आहे. भारतीय इंग्रजी भाषा शिक्षक संघटना आणि एमआयटी-एडीटी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इएलटीआय’ची २० वी आंतरराष्ट्रीय व ५६ वी वार्षिक परिषद ७ ते १० ऑक्टोबरदरम्यान लोणी-काळभोर येथे आयोजित करण्यात आली…