Headlines

कळमनुरी गोळीबार आणि खून प्रकरण:16 जणांवर 'मकोका'; हिंगोली पोलिसांची मोठी कारवाई

कळमनुरी येथील जूने बसस्थानक भागात गोळीबार करून खून केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेल्या 16 जणांवर मकोका लावण्यात आला असून या प्रकरणात आता कलम वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक एन. एस. देशमुख यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. एकाच वेळी 16 जणांवर करण्यात आलेली ही कारवाई हिंगोली पोलीस दलाच्या इतिहासातील मोठी कारवाई…

Read More

यूपीमधील सर्वात उंच इमारतीच्या 43व्या मजल्यावरून तरुणाने मारली उडी:शरीराचे तुकडे-तुकडे झाले, 30-40 फूट दूर जाऊन पडला

नोएडामध्ये एका तरुणाने शनिवारी उत्तर प्रदेशातील सर्वात उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. त्याने 68 मजली इमारतीच्या 43व्या मजल्यावरून उडी घेतली. जमिनीवर पडताच त्याच्या शरीराचे तुकडे झाले. शरीराचे तुकडे 30-40 फूट दूरपर्यंत विखुरले. सर्वत्र रक्तच रक्त पसरले. ही घटना सेक्टर-94 मधील सुपरनोव्हा सोसायटीच्या अस्पायर टॉवरमध्ये घडली. घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यात संभव जैन (29)…

Read More

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली:जमीन विकली, पत्नीची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटेना; चिठ्ठी लिहून आत्महत्या

शेतीतील नुकसान, सततची नापिकी आणि डोक्यावर वाढत जाणारे कर्ज यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. संग्रामपूर तालुक्यातील चोंडी टाकळेश्वर येथे शंकर रामभाऊ भारसाकळे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत कर्ज…

Read More

‘चुट्टामल्ले’च्या मॉर्फ्ड व्हिडिओवर संतापला ज्युनियर NTR:म्हणाला- महिलांना देवी मानणाऱ्या देशात AI च्या माध्यमातून अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही

दक्षिणात्य अभिनेता ज्युनियर NTR त्यांच्या ‘देवरा: पार्ट 1’ चित्रपटातील ‘चुट्टामल्ले’ गाण्याच्या AI च्या मदतीने तयार केलेल्या मॉर्फ्ड व्हिडिओवरून संतापले. हे गाणे जान्हवी कपूरसोबत चित्रित करण्यात आले होते. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “हे अत्यंत घृणास्पद, लज्जास्पद आणि निंदनीय आहे. ज्या देशात महिलांचा आई आणि देवी म्हणून सन्मान केला जातो आणि ‘मातृदेवो भव’ हा आपल्या संस्कृतीचा भाग…

Read More

स्वराज्यासोबत 'स्वभाषे'चा नारा शिवरायांनीच दिला:संत साहित्यापासून ते महामानवांपर्यंत समाजाला दिशा देण्याचे काम मराठीने केले- CM देवेंद्र फडणवीस

संत साहित्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘स्वभाषे’च्या आग्रहापर्यंत आणि महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवांच्या समतेच्या विचारांपर्यंत समाजाला दिशा देण्याचे महान कार्य माय मराठीने केले असून, ही समृद्ध भाषा आपल्या सर्वांसाठी नितांत अभिमान आणि स्वाभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देवेंद्र…

Read More

महावितरण नाट्य स्पर्धा:जळगाव परिमंडलाचे 'वारी' प्रथम, छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे 'राजाभियोग' द्वितीय

महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलाच्या ‘वारी’ या नाटकाने बाजी मारत सर्वोत्कृष्ट नाटकाचा प्रथम क्रमांक पटकावला. तर छत्रपती संभाजीनगर परिमंडलाच्या ‘राजाभियोग’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाने गौरविण्यात आले. तापडिया नाट्यमंदिरात आयोजित या स्पर्धेचा शानदार समारोप शुक्रवारी (२ ऑक्टोबर) पार पडला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर परिमंडलाने पेशवाईतील…

Read More

NHRC Notice To Mumbai Police Commissioner Over Minor Children In Protest

2 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईत झालेल्या एका सार्वजनिक आंदोलनात अल्पवयीन मुलांचा कथित सहभाग आणि त्यानंतर त्यांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याबाबतच्या तक्रारीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) ‘मानवाधिकार संरक्षण कायदा, 1993’ च्या कलम 1 . कॉकरोच जनता पार्टीने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणात (एसआयआर) झालेल्या कथित अनियमिततेप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याच्या…

Read More

मराठवाड्याच्या हक्काचे 255 टीएमसी पाणी विनाविलंब द्या:मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीची मागणी, संभाजीनगर येथे बैठक घेणार

मराठवाड्याच्या हक्काचे एकूण मंजूर 255 टीएमसी पाणी विनाविलंब मिळावे तसेच प्रकल्पांसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीने शनिवारी ता. 3 हिंगोली येथील बैठकीत करण्यात आली आहे. या मागणीसाठी मराठवाडास्तरीय बैठक छत्रपती संभाजीनगर येथे घेतली जाणार आहे. हिंगोली येथे माजी खासदार ॲड. शिवाजी माने यांच्या् अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी…

Read More

मतदार यादीतील हरकतींसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ:बीएलओ घरी येऊन कागदपत्रे स्वीकारणार, नोटीसधारकांना दिलासा

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ‘नो मॅपिंग’ किंवा तार्किक विसंगतीमुळे नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे स्वीकारणार आहेत. त्यामुळे…

Read More

म्युल बँक खात्यांद्वारे पावणेदोन कोटींची फसवणूक:देशभरातील 19 नागरिकांना गंडा, पाच जणांना अटक

नागरिकांच्या नावावर बँक खाती उघडून त्यांचा ऑनलाइन आर्थिक फसवणुकीसाठी वापर करणाऱ्या टोळीचा वानवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. देशभरातील १९ नागरिकांची एकूण एक कोटी ८० लाख १५ हजार ७९५ रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली. श्रवण अंकुशे (वय २५), हरिओम हरिराम साहू (वय २४), सौद शेख (वय २३), साहील…

Read More