शेंदुरजनाबाजार येथे संत अच्युत महाराजांना हजारो भाविकांनी वाहिली श्रद्धांजली:अभिनेते भारत गणेशपुरे, गायक रघुनाथ कर्डीकर उपस्थित; 'संतबोध' पुस्तकाचे विमोचन झाले.
गुरुमाऊली संत अच्युत महाराजांना शनिवारी श्री क्षेत्र शेंदुरजनाबाजार येथील महासमाधीस्थळी हजारो भाविकांनी मौन श्रद्धांजली वाहिली. ३ ऑक्टोबर रोजी महाराजांचे देहावसान झाले होते. या दिवसाचे स्मरण म्हणून दरवर्षी श्रद्धांजली कार्यक्रम होतो. यावेळी अभिनेते भारत गणेशपुरे आणि गायक रघुनाथ कर्डीकर उपस्थित होते. कर्डीकर यांच्या भक्तीमय गीतांनी वातावरण भावविभोर झाले. कार्यक्रमानंतर महाराजांची आरती आणि सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली….