Headlines

पर्यावरण संरक्षण:पीव्हीसी पाईपच्या "वॉटर बँक'ने कमी पाण्यात वटवृक्षांना जीवदान, एक वृक्ष, एक जीवन अंतर्गत 1000 वटवृक्ष लागवड मोहिम

खड्ड्यात बसविलेला पीव्हीसी पाईप, तळाशी अंथरलेले नारळाच्या शेंड्यांचे थर आणि त्यातून तयार झालेली वॉटर बँक, या अभिनव तंत्रामुळे कमी पाण्यातही १२ ते १४ फूट उंचीचे प्रौढ वटवृक्ष यशस्वीपणे जगविण्याचा प्रयोग अहिल्यानगरातील “कर्म फाउंडेशन’ने करून दाखविला आहे. “झाडे लावा, झाडे जगवा’सह “झाडे लावा, पृथ्वी वाचवा’ हा संदेशही या संस्थेने दिला. दिव्य मराठीच्या एक वृक्ष, एक जीवन…

Read More

पूर्णवेळ अभियंता अन् 8 तास वीजेसाठी शेतकरी आक्रमक:मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार‎

काही दिवसांपासून महावितरणकडून शेतीसाठी होणारा वीजपुरवठा अत्यंत अनियमित होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून महावितरणच्या सात्रळ सबस्टेशनच्या आवारात किरण कडू यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालू राहणार असल्याचे सांगितले. आंदोलक शेतकरी तसेच ग्रामस्थांनी मागण्यांचे निवेदन डेप्युटी इंजिनियर पाटील तसेच सब स्टेशनचे सब इंजिनियर दिलीप गाढे यांना दिले. सात्रळ…

Read More

वडाळीभोईतील हायवे मॉल ग्रामीण व्यापाराला नवी दिशा देणारा ठरेल:चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेर यांचे प्रतिपादन‎

वडाळीभोई येथे उभारण्यात येणारे भव्य व्यापारी संकुल (हायवे मॉल) परिसरातील व्यापाराला नवी दिशा देणार असून, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन आहेर यांनी व्यक्त केला. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वडाळीभोई व वडनेरभैरव येथील उपबाजार आवारात विविध महत्त्वाकांक्षी विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी…

Read More

भक्तिमय मोहीम:मनमाड रायडर्सची 3 दिवसांत नाशिक ते पंढरपूर 380 किमी सायकल वारी

मनमाड सायकलिस्टने १० ते १२ जुलै या कालावधीत ‌‘रॉयल रायडर्स‌’ व नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सोबतीने नाशिक ते पंढरपूर अशी ३८० किलोमीटरची सायकल वारी यशस्वीरित्या पूर्ण केली. वारीला १० जुलै रोजी सकाळी ५:३० वाजता नाशिक येथे‌ ‘फ्लॅग ऑफ‌’ करण्यात आला. पहिल्याच दिवशी सिन्नर घाट हे मोठे आव्हान होते. जिद्दीच्या बळावर घाट पार करत रायडर्स वारीत सहभागी…

Read More

एनसीसी प्रशिक्षण शिबिरात लोकनेते पाटील विद्यालयाची यशस्वी कामगिरी:चित्रकला, गायन व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये प्रथम; विजेतेपदाची पटकावली ट्रॉफी‎

लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय, लासलगाव येथील एनसीसी कॅडेट्सनी नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियमवर ६ ते १५ जुलैदरम्यान आयोजित वार्षिक एनसीसी प्रशिक्षण शिबिरात विविध स्पर्धांमध्ये दैदिप्यमान यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. शिबिरात ड्रिल, साहसिक उपक्रम, फायरिंग, रस्सीखेच तसेच सांस्कृतिक आणि कौशल्याधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांमध्ये विद्यालयाच्या कॅडेट्सनी उल्लेखनीय कामगिरी…

Read More

जामनेरात विविध प्रजातीच्या 111 वृक्षारोपणासह संवर्धनही करणार:बीओटी मार्केट व आयटीआयचा संपूर्ण परिसर हिरवागार होणार‎

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी शहरात भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमांतर्गत शहरातील बीओटी मार्केट आणि स्व. हरिभाऊ रामकृष्ण बारी आयटीआय परिसरामध्ये एकूण १११ विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेवक अतिश झाल्टे, रवींद्र झाल्टे, राहुल चव्हाण…

Read More

भारनियमनामुळे विद्यार्थ्यांचा रात्री वीज कार्यालयात अभ्यास:रात्रीचे भारनियमन त्यात बिबट्याची दहशत; दिंडाेरीचे नागरिक व विद्यार्थी त्रस्त

दिंडोरी परिसरातील वाढत्या वीज भारनियमनामुळे हैराण झालेल्या विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी थेट वीज कंपनीच्या कार्यालयात जात रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत अनोखे आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी कार्यालयातच अभ्यास केला. अखेर, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर बोलून भारनियमन रद्द करण्याचे व वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. ​निळवंडी रस्त्यावरील जाधव वस्ती, पिंगळे वस्ती, बोरस्ते वस्ती…

Read More

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी सिल्लोडमध्ये मातंग समाजाचा मोर्चा‎:लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा- सचिन साठे

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकार घेत असलेल्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ‘अ ब क ड’ निर्णयाच्या समर्थनार्थ सकल मातंग समाज तसेच अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन कृती समिती सिल्लोड तालुका यांच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयावर गुरुवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण उपवर्गीकरण करण्यासंदर्भात १ ऑगस्ट २०२४ रोजी राज्य सरकारला निर्देश दिलेले आहेत. तसेच…

Read More

पारंपरिक मार्गाला बगल:427 वर्षांची परंपरा; नाथांच्या पालखीचा मूळ मार्ग बदलल्याने वारकऱ्यांमध्ये संताप

संत एकनाथ महाराजांच्या तब्बल ४२७ वर्षांच्या अखंड पालखी परंपरेसमोर आता मार्ग बदलण्याचे संकट उभे ठाकले आहे. सध्या नाथांची पालखी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात आहे. या जिल्ह्यातून नाथांची पालखी शतकानुशतके ज्या पारंपरिक मार्गाने पंढरपूरकडे प्रस्थान करते, त्या मार्गाऐवजी दुसऱ्याच मार्गावर रस्त्याची कामे हाती घेण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे नाथांच्या पालखीचा प्रवास ९ कि.मी….

Read More

MP-UPत 2 दिवसांनंतर मान्सून येणार:राजस्थानला 5 दिवस पाहावी लागेल वाट, पुरीत आजही मुसळधार पावसाचा इशारा

मध्य प्रदेशात उशिरा दाखल झालेला मान्सून काही दिवसांतच कमकुवत झाला आहे. राज्याच्या बहुतांश भागातून ढग गायब झाले आहेत. मात्र, हवामान विभागाचे म्हणणे आहे की, मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशात जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात मान्सून वेग पकडू शकतो आणि 19 जुलैपासून वेस्टर्न डिस्टर्बन्स, चक्रीवादळ प्रणालीमुळे जोरदार पाऊस होऊ शकतो. हवामान विभागाने बिहारमध्ये 17 जुलै रोजी किशनगंज,…

Read More