तिजोरीवर भार:अंत्योदय कुटुंबांसाठीची मोफत साडी योजना 2 वर्षातच गुंडाळली, 5 वर्षांची योजना अचानक रद्द, 25 लाख कुटुंबांना फटका
महाराष्ट्र राज्यातील अंत्योदय रेशनकार्डधारक अत्यंत गरीब कुटुंबांना मोठा दिलासा देणारी आणि यंत्रमाग क्षेत्राला भक्कम आर्थिक बळ देणारी ‘कॅप्टिव्ह मार्केट साडी योजना’ राज्य सरकारने अचानक मुदतीपूर्वीच बंद केली आहे. राज्याच्या तिजोरीवरील वाढता आर्थिक भार तात्काळ कमी करण्यासाठी वस्त्रोद्योग विभागाने गुरुवारी या संदर्भातील अंतिम शासन निर्णय जारी केला. वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ चा महत्त्वपूर्ण भाग असलेली ही योजना…