Headlines

लाडसावंगी येथे रस्त्यावरील चिखलामुळे व्यापारी आक्रमक:निषेध करत रस्त्यात लावली बेशरमाची झाडे‎

पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यांची झालेली चाळण, साचलेला चिखल आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे संतप्त झालेल्या लाडसावंगी येथील व्यापारी मंडळाने गुरूवारी रस्त्यावर उतरून अनोखे आंदोलन केले. शिवाजी महाराज चौक ते मारोती मंदिर या मुख्य रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या डबक्यात व चिखलात व्यापाऱ्यांनी एकत्र येत बेशरमाची झाडे लावून सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचा तीव्र निषेध नोंदवला. ​ या आंदोलनात ​जितू पडुळ, अजय…

Read More

पाणीटंचाईच्या झळा तीव्र:जुलै अर्धा संपला तरी 28 टँकर सुरू‎, गंगापूर, खुलताबाद, पैठण, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर तालुके टँकरमुक्त‎

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने पाण्यासाठी अजूनही २८ टँकरद्वारे पुरवठा केला जात असून ३० खासगी विहिरी अधिग्रहित ठेवल्या आहेत. दिलासादायक म्हणजे गंगापूर, खुलताबाद, पैठण, सिल्लोड, सोयगाव आणि वैजापूर हे सहा तालुके टँकरमुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या २८ टँकरपैकी २० टँकर फुलंब्री तालुक्यात कार्यरत असून, अधिग्रहित ३० विहिरींपैकी २२ विहिरीही याच तालुक्यात आहेत. उर्वरित टँकर आणि…

Read More

पावसाची दडी:सिल्लोडमध्ये 93 हजार हे. पिके संकटात, खरिपाची 94 टक्के पेरणी, आता दुबार पेरणीचे संकट गडद‎

सिल्लोड तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात पोहोचली असतानाच, पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. १३ जुलैपर्यंतच्या महसूल मंडळनिहाय अहवालानुसार, तालुक्यातील ९९ हजार ८७ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी ९३ हजार ७९७ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून, ही टक्केवारी ९४.६६ टक्क्यांवर आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने उगवलेली कोवळी…

Read More

विठ्ठलाला अर्धा किलो सोन्याच्या पादुका:अहिल्यानगरच्या दानशूर भक्ताकडून अर्पण, मात्र नाव गोपनीय ठेवण्याची इच्छा

अहिल्यानगरच्या एका दानशूर विठ्ठल भक्ताने श्री विठ्ठल मूर्तीसाठी ४४६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पादुका दान केल्या आहेत. त्याने आपले नाव गोपनीय ठेवावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. या सुवर्ण पादुकांची अंदाजे किंमत रु. ५६ लाख ५९ हजार रुपये इतकी आहे. आषाढी यात्रेचा कालावधी सुरू झाला आहे. मंदिरात सोने, चांदी वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र दान कक्षाची व्यवस्था…

Read More

Maharashtra Monsoon Rainfall Deficit Update; Low Rain Forecast 2026

एल निनोचा तीव्र तडाखा महाराष्ट्राला बसत आहे. १६ जुलैपर्यंत राज्यात सरासरी ३७८.४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे, प्रत्यक्षात ३३६.२ मिमी पाऊस झाला. म्हणजे ११.२ टक्के तूट पडली आहे. दोन आठवड्यांपूर्वी पुणे, मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस झाला. परंतु राज्याच्या . विदर्भ आणि मराठवाड्यात परिस्थिती बिकट आहे. गेल्या वर्षी १६ जुलै २०२५ पर्यंत नागपूर विभागात ११३.६% पाऊस…

Read More

संभाजीनगरातील उपायुक्त कार्यालयातील ग्रेड पीएसआयकडून शिक्षिकेवर अत्याचार:गुन्हा दाखल होताच आरोपी पसार, सीपींकडे अहवाल सादर

शहरातील उपायुक्त कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत ग्रेड पीएसआय हरीश माधवराव खटावकर (५३) याने खासगी शाळेतील शिक्षिकेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. खटावकर याची पीडितेशी ४ वर्षांपूर्वीची ओळख होती. त्याने मे २०२५ ते १५ जुलै २०२६ या काळात हॉटेलमध्ये काम असल्याचे सांगून तसेच घराचे इंटेरिअर बघण्याच्या बहाण्याने बोलावून पीडितेवर अत्याचार केला. नकार दिल्यास पतीला सांगून…

Read More

नव्या 2 सिस्टिम्सने मान्सून वेग पकडणार:20 जुलैपासून उत्तर, मध्य भारतात पाऊस, बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आशादायक चित्र

देशात कमकुवत झालेल्या मान्सूनला पुन्हा एकदा गती मिळण्याचे संकेत दिसत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि त्याला लागून असलेल्या ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील सात दिवसांत पूर्व आणि पूर्वोत्तर भारत, पूर्व यूपी तसेच पश्चिम हिमालयीन क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर वाढेल. अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून ओडिशामध्ये १६…

Read More

दिव्य मराठी इम्पॅक्ट:14 कोटींच्या सोलार घोटाळ्याची चौकशी महिन्यात करण्याचे आदेश, दोषी कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार

जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांवर सोलार यंत्रणा न उभारताच बिले उचलण्याच्या प्रकरणात चौकशी करावी. दोषी कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी सदस्यांनी घेतली. सदस्य आक्रमक झाल्यानंतर अध्यक्ष अविनाश गलांडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिन्नू यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले. आरोग्य केंद्रावर सोलार न बसवताच बिले उचलल्याचा प्रकार ‘दिव्य मराठी’ने समोर आणला होता. यावरून जिल्हा…

Read More

उभ्या नादुरुस्त ट्रकला कार धडकल्याने 2 ठार:मृतांमध्ये सिल्लोडचा एक जण, जळगाव मार्गातील गाडेगाव घाटात अपघात; 3 चुलतभाऊ गंभीर

जळगाव-नेरी महामार्गावरील गाडेगाव घाटात वळणावर उभ्या नादुरुस्त ट्रकला भरधाव कारने (एमएच १९ ईपी ९०६६) धडक दिल्याने छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील एका व्यक्तीसह दोघांचा मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात गुरुवारी सायंकाळी ५ वाजता झाला. धडकेनंतर कार पलटी झाल्याने गाडीचा चुराडा झाला. मृतांमध्ये कारचालक इस्रायल इरफान शेख (२१, रा. पिंपळदरी, ता. सिल्लोड)…

Read More

सयामी जुळ्या बहिणींची आता वेगळे न होण्याची इच्छा:सलमान खानने बहीण मानले, उपचाराचीही ग्वाही दिली, आता फोनही उचलत नाही

या आहेत सबा आणि फरहा. वय 24 वर्षे. दोघींचा जन्म एकाच दिवशी, एकाच वेळी आणि एकाच आईच्या गर्भातून झाला. त्यामुळे त्या जुळ्या म्हणून ओळखल्या जातात. पण… त्यांची शरीरे वेगवेगळी नाहीत. त्या डोक्याने एकमेकांना जोडलेल्या आहेत. तेही अशा प्रकारे की दोघी एकमेकींना पाहूही शकत नाहीत. आरशातही नाही, कारण एकीचे तोंड आरशाकडे असेल तर दुसरीचे त्याच्या उलट…

Read More