यंदा 100 स्टार्टअप्सना 25 हजारांचे ‘सीड फंडिंग’:विद्यापीठ-अमृत संस्थेचा सामंजस्य करार; नवउद्योजकांना मिळणार आता नवे बळ
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे रिसर्च अँन्ड इन्क्युबेशन फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाची ‘अमृत’ संस्था (पुणे) यांच्यात नुकताच सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. या कराराअंतर्गत विद्यापीठातील १०० नवसंशोधकांची टप्प्याटप्प्याने निवड करण्यात येणार असून, प्रारंभी २५ स्टार्टअप्सना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक स्टार्टअपला ‘अमृत’ संस्थेकडून एका वर्षासाठी दरमहा २५ हजार रुपयांची फेलोशिप अथवा…