सोयाबीन बियाणे निकृष्ट निघाल्यामुळे बुस्टर कंपनीवर गुन्हे नोंदवा- साबळे:बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल नकेल्यास जोडेमारो आंदोलनाचा इशारा
तालुक्यातील लाडकी खोपडा गावासह विविध भागातील शेत शिवारात बुस्टर कंपनीचे हुतुतू सोयाबीन बियाणे निकृष्ट निघाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हितेश साबळे यांनी बुस्टर कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह कृषी शास्त्रज्ञांनी शेतीला भेट देऊन पाहणी केली. या पाहणीच्या वेळी आरआरसी संशोधन केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी उज्ज्वल आगरकर,…