विद्यार्थी दिन साजरा:विद्यार्थी नेतृत्व घडवण्यात अभाविपचे योगदान, ॲड. गिरीश गोखले यांचे प्रतिपादन
विद्यार्थी हा समाजाचा व राष्ट्राचा भावी कणा मानला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या संघटनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. देशातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनांपैकी एक असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गत सात दशकांहून अधिक काळ विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी व नेतृत्वगुण विकसित करण्याचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन अभाविपचे कार्यकर्ते तथा नगरसेवक ॲड. गिरीश…