युवक काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह:अयोध्या राम मंदिरातील अपहारप्रकरणी एल्गार
प्रभू श्रीरामांच्या पवित्र अयोध्यानगरीतील राम मंदिराच्या देणग्यांच्या कथित अपहाराच्या निषेधार्थ माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात शनिवारी युवक काँग्रेसने ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह केला. कधीकाळी रामभक्तीचे प्रमाणपत्र देणारेच आज रावण म्हणून पुढे आले, असा घणाघात यावेळी डॉ. देशमुख यांनी केला. कठोरा रोडवरील सौरभ कॉलनी परिसरातील श्रीराम मंदिर येथे हे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी…