Headlines

इफ्तार पार्ट्यांमध्ये सहभागी होताना धर्मांधता दिसत नाही का?:शरद पवार यांच्या वारकरी संप्रदायावरील वक्तव्यावर तुषार भोसलेंचा पलटवार

वारकरी संप्रदायाबाबत राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित स्मरणिकेत त्यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या मते, संप्रदायातील सुमारे 60 टक्के लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचे दिसून येते….

Read More

विज्युक्टा’चे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन:मोफत शिक्षण संपवण्याच्या धोरणाविरोधात शिक्षकांचा आक्रमक पवित्रा

विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन (विज्युक्टा) ने बुधवारी अमरावती येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शासनाच्या मोफत शिक्षण संपवण्याच्या आणि शिक्षकांची संख्या घटवण्याच्या धोरणाविरोधात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी दुपारपर्यंत कार्यालयाला घेराव घातला, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षकांच्या मते, शासनाने सामान्यांचे मोफत शिक्षण संपुष्टात आणण्याचा डाव आखला आहे. याचाच एक भाग…

Read More

विष्णुनगर -हनुमाननगर दरम्यानचा शिवरस्ता खुला:15 वर्षांपासून बंद हाेता 1700 फूटांचा शिवरस्ता; शेतकऱ्यांचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी‎

तालुक्यातील विष्णुनगर ते हनुमाननगर दरम्यानचा गेल्या सुमारे १५ वर्षांपासून बंद असलेला १७०० फूट लांबीचा आणि १८ फूट रुंदीचा महत्त्वाचा शिवरस्ता महसूल व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर मोकळा करण्यात आला आहे. रस्ता खुला झाल्याने परिसरातील शे . गाव नकाशात तुटक रेषेने दर्शविलेला हा रस्ता अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाची ने-आण करताना…

Read More

भाजपची एकसूत्री यंत्रणा, हिंदुत्वाचा मुद्दा:सहानुभूतीची लाट, भाजपची सूक्ष्म व्युहरचना अन् मविआतील समन्वयाचा अभाव कर्डिलेंच्या पथ्यावर

Marathi News Local Maharashtra Ahmednagar Wave Of Sympathy, BJP’s Subtle Structure And Lack Of Coordination Within The MIA On The Path Of The Kardile, BJP’s One pointed System, The Issue Of Hindutva राहुरी4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने जिल्ह्याच्या राजकारणात भाजपची पकड पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. अक्षय कर्डिले यांचा झालेला हा विजय…

Read More

वाशिम जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल:धुमका-तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश, शेतकऱ्यांच्या लढ्याला यश

जमीन अधिग्रहणाच्या हक्काच्या मोबदल्यासाठी कायदेशीर लढा देणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने वाशिम जिल्हा न्यायालयाने एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. सरकारी यंत्रणांनी न्यायालयाच्या आधीच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याची गंभीर दखल घेत, मुख्य जिल्हा न्यायमूर्तींनी थेट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) मोठा दणका दिला असून वाशिम जिल्ह्यातील धुमका-तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचे कडक आदेश जारी केले आहेत. वाशिम…

Read More

कोसळलेला ‘सिलकॅरा’ही नवयुगनेच बांधला:मिसिंग लिंक बांधणाऱ्या ‘नवयुग’ने भाजपला दिला होता 55 कोटी फंड

मुंबई-पुणे मिसिंग लिंकमधील २,८६५ कोटींचे दोन बोगद्यांची कामे नवयुग इंजिनिअरिंग कंपनीने केलेली आहेत. या कंपनीने भाजपला ५५ कोटींचा निवडणूक निधी दिला होता. १८ एप्रिल २०१९ रोजी प्रत्येकी १ कोटीचे ३० तर १० ऑक्टोबर २०२२ रोजी प्रत्येकी १ कोटीचे २५ असे एकूण ५५ कोटींचे निवडणूक रोखे कंपनीने भाजपसाठी खरेदी केले होते. ऑक्टोबर-२०१८ मध्ये कंपनीला कार्यादेश दिले….

Read More

हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी:डेक्कन पोलिसांनी दोघांना केली अटक; बनावट मेसेज दाखवून मोबाईल खरेदी

पुणे शहरात डेक्कन पोलिसांनी हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. एका तरुणाला मारहाण करून त्याच्या फोनपे खात्यातून पैसे काढून घेण्यात आले होते. निखील संदीप जाधव (वय २०, रा. जनता वसाहत) आणि ओंकार रमेश गरुड (वय २१, रा. गंजपेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नागेश हनुमंत पाटील (वय…

Read More

माऊलींच्या स्वागताला 21 तोफांची सलामी:धर्मपुरी गावात होणार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन‎

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज (१९ जुलै) प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार असून, माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे माऊलींच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जिल्हाभरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून पालखी स्वागतासाठी प्रशासनासह भाविकांनी जय्यत तयारी केली आहे. दि.८ जुलै रोजी प्रस्थान ठेवलेला पालखी सोहळा आज सकाळी सुमारे ११ वाजता धर्मपुरी गावाच्या पश्चिमेस…

Read More

Skyroot Vikram-1 Launch | Sriharikota Space Mission Update

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक हैदराबादची स्कायक्रूट एरोस्पेस आज शनिवार, 18 जुलै रोजी भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 प्रक्षेपित करेल. हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून सकाळी 11:30 वाजता होईल. कंपनीने 2022 मध्ये विक्रम-S सबऑर्बिटल रॉकेट प्रक्षेपित केले होते, जे 89.5 किमी उंचीपर्यंत गेले होते. आता विक्रम-1 450 किमीच्या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत जाईल. सोन्याचे कलाम,…

Read More

सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना टोला:एका तालुक्याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाही; कंत्राटदारांच्या अधिवेशनाची क्लिपही पाठवणार

कोल्हापूर जिल्ह्यातील विकासकामांच्या असमतोलावरून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जिल्हा नियोजन समितीचा (डीपीडीसी) निधी केवळ सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघात खर्च केला जात असून विरोधी पक्षांच्या मतदारसंघांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “एका तालुक्याचा विकास झाला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला, असे होत नाही,” असा खोचक टोला त्यांनी वैद्यकीय शिक्षण…

Read More