जिल्ह्यात दुष्काळामुळे 75 हजार घरकुलांची कामे ठप्प:39000 घरांचा श्रीगणेशाच नाही, पाणीटंचाई अन् बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने घरांचे स्वप्न अपूर्ण
. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतातील पिकापाठोपाठ आता ग्रामीण भागातील बेघरांच्या हक्काच्या घरांची बांधकामेही ठप्प झाली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (टप्पा-२) अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजनेला दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. प्रशासनाकडून पहिला हप्ता जमा होऊनही पाण्याची तीव्र टंचाई आणि निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमुळे जिल्ह्यातील तब्बल ७५,०९९ घरकुलांची कामे रखडली आहेत. सुमारे ३९ हजार लाभार्थींनी अजून…