नवी मुंबईत गुंडांचा हैदोस:घरासमोर बसू नको म्हणाणाऱ्या तरुणासह आईवर तलवार अन् चॉपरने जीवघेणा हल्ला, एकाला अटक
नवी मुंबई शहरातील कोपरखैरणे सेक्टर-19 परिसरात रात्रीच्या सुमारास गुंडगिरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरासमोर बसण्याला विरोध केल्याच्या किरकोळ कारणावरून दोन तरुणांनी तलवार आणि चॉपरचा धाक दाखवत एका तरुणावर जीवघेणा हल्ला चढवला. इतकेच नव्हे, तर मुलाचा जीव वाचवण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी मध्ये आलेल्या त्याच्या आईलाही आरोपींनी सोडले नाही; तिच्या डोक्यात शस्त्राने वार करून तिला…