बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली:जमीन विकली, पत्नीची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटेना; चिठ्ठी लिहून आत्महत्या
शेतीतील नुकसान, सततची नापिकी आणि डोक्यावर वाढत जाणारे कर्ज यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. संग्रामपूर तालुक्यातील चोंडी टाकळेश्वर येथे शंकर रामभाऊ भारसाकळे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत कर्ज…