शब्दाला किंमत असते; अर्थ खाते राष्ट्रवादीकडे द्या!:अमोल मिटकरींनी मुख्यमंत्री फडणवीसांना करून दिली वचनाची आठवण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरते स्वतःकडे ठेवले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिले जाईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र अधिवेशन संपूनही अर्थ खाते अद्याप मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा या मुद्द्यावर आवाज उठू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी…