Headlines

मोर्शीत पंचनामा न करताच अधिकारी निघून गेले, तक्रारदार जखमी:बोगस मासेमारी सदस्यांच्या चौकशीसाठी आले होते अधिकारी, आंदोलकांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला

मोर्शी येथे बोगस मासेमारी सदस्यांच्या चौकशीसाठी आलेले मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी पंचनामा न करताच निघून गेले. त्यांचे वाहन अडवताना एक तक्रारदार जखमी झाला. पाक प्रकल्पावर (तलाव) बोगस सक्रिय सदस्यांवरून हा वाद सुरू आहे. खडका गावातील नागरिकांनी बोगस सदस्यांना रोखण्यासाठी आंदोलन केले आहे. यशस्वी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, बारगावचे सदस्य सक्रिय नसल्याचा दावा आहे. या मागणीसाठी महिलांनी २५…

Read More

एका क्लिकने विचार करायला लावणारी छायाचित्रे: हृदयनाथ मंगेशकर:पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि महापालिकेचा संयुक्त उपक्रम, 9 ऑक्टोबरपर्यंत खुले

एखाद्या क्षणाला कॅमेऱ्यात बंदिस्त करणारी एक ‘क्लिक’ किती व्यापक आशय व्यक्त करू शकते, किती प्रश्न उपस्थित करू शकते आणि किती विचार करायला भाग पाडू शकते, याची प्रचिती पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील वृत्तपत्र छायाचित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनातून येत आहे, असे मत ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघ…

Read More

पाकिस्तानी दहशतवादी नेटवर्कशी संबंधित कर्नाटकातील तरुणाला अटक:व्हॉट्सॲप-इन्स्टाग्रामवर शस्त्र तस्करी आणि विक्रीबाबत संभाषण केल्याचा आरोप

कर्नाटकमधील बिदर येथे दहशतवादी कारवायांच्या आरोपावरून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला तरुण विशाल कुमार मेट्रे (24) पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी शहजाद भट्टी, राणा हनैन आणि नोमी खान यांच्या संपर्कात होता. गुप्तचर माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विशाल हा बिदरमधील भालकी तालुक्यातील येनकूर गावचा रहिवासी आहे. तो व्हॉट्सॲप आणि…

Read More

पुण्यात 6500 झाडे लावणार, 500 वृक्षांचे पुनर्रोपण:पुणे मनपा-आनंदवन फाउंडेशनचा उपक्रम; कोथरूड डीपी रोडचा मार्ग मोकळा

पुणे महानगरपालिका आणि आनंदवन फाउंडेशन यांनी संयुक्तपणे वृक्षारोपण व पुनर्रोपणाचा उपक्रम हाती घेतला असून, या अंतर्गत पुण्यात ६,५०० नवीन वृक्षांची लागवड आणि ५०० विद्यमान वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. आनंदवन फाउंडेशनने आपल्या देखरेखीखाली असलेल्या सर्व्हे नं. १८ येवलेवाडी येथील ७ हेक्टर जागेवर वृक्षारोपण व पुनर्रोपणाचे काम करण्यासाठी पुणे महानगरपालिकेला संमती दिली आहे. वृक्षारोपण व पुनर्रोपण…

Read More

ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेसाठी संशोधनाला प्रोत्साहन आवश्यक:विद्यार्थ्यांना संधी दिल्यासच जागतिक बाजारपेठेत स्पर्धा शक्य: डॉ. विवेक सावंत

जगाची नवीन अर्थव्यवस्था ही ज्ञानावर आधारित असून ज्ञान हाच तिचा कच्चा माल आहे. संशोधन, पेटंट आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या बौद्धिक संपत्तीवर आधारित रॉयल्टी ही भविष्यातील अर्थव्यवस्थेची महत्त्वाची ताकद ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी संधी, अत्याधुनिक ज्ञान आणि नवउत्पादनासाठी आवश्यक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. आपली बुद्धिमान मुले परदेशात जाऊन संशोधन करतात आणि त्यातून मिळणारी…

Read More

विक्रम शिंगाडेंवरील विनयभंगाच्या गुन्ह्याने माणमध्ये राजकीय वातावरण तापले:म्हसवड पोलीस ठाण्यासमोर अभयसिंह जगतापांचे ठिय्या आंदोलन

माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे यांच्यासह अन्य आठ जणांविरोधात दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, कोणत्याही राजकीय किंवा अन्य दबावाला बळी न पडता या प्रकरणातील सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, या मागणीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभयसिंह जगताप यांनी म्हसवड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनानंतर…

Read More

उधारीच्या वादाचे रक्तरंजित पर्यवसान; शेंद्रेत तरुणाचा खून:खोऱ्याने डोक्यात घाव; भाड्याने राहणाऱ्या दोघा भावांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जुन्या उधारीच्या पैशांवरून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान शेंद्रे (ता. सातारा) येथे रक्तरंजित हल्ल्यात झाले. सौरभ बाळू भिसे (वय २९) या युवकाच्या डोक्यात खोऱ्याने घाव घालून त्याचा खून करण्यात आला. शनिवारी घडलेल्या या घटनेने शेंद्रे परिसरात खळबळ उडाली. घटनेनंतर सातारा तालुका पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत प्रमोद किसन जाधव व प्रताप किसन जाधव या दोघा भावांना…

Read More

आयटी प्रकल्पांचे आमिष दाखवून 1.85 कोटींची फसवणूक:कंपनी स्वतःची असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांनी फसवले; दोघांविरोधात गुन्हा

आयटी कंपनीला प्रकल्प मिळवून देण्याचे आमिष दाखवत बनावट अॅग्रीमेंट आणि कागदपत्रांच्या आधारे दोघांची एक कोटी ८५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली आहे. कंपनी स्वतःच्या मालकीची असल्याचे भासवून भागीदारीत कंपनी स्थापन करण्यास आणि मोठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रवीण दत्तू शेळके आणि निता प्रवीण शेळके…

Read More

Loha District Marathi Literature Conference 2026

मराठवाडा साहित्य परिषद, शाखा नांदेड आणि डी. के. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे जिल्हा मराठी साहित्य संमेलन शनिवार, 10 ऑक्टोबर 2026 रोजी लोहा येथे आयोजित करण्यात आले आहे. स्व. माजी खासदार भाई डॉ. केशवराव धोंडगे यां . सायाळ रोडवरील डी. के. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या परिसरात होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ…

Read More

एअर चीफ मार्शल म्हणाले- तेजसच्या वितरणाला होणारा विलंब आमचे नुकसान:हवाई दलाला दरवर्षी 36-40 फायटर जेट्सची गरज; विद्यमान स्क्वॉड्रनची संख्या घटून 29 झाली

एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी शनिवारी सांगितले की, तेजस लढाऊ विमानांचा समावेश करण्यास होत असलेल्या विलंबामुळे भारतीय हवाई दलाचे नुकसान होत आहे. सध्याच्या परिस्थितीत आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हवाई ताकद अत्यंत आवश्यक होत चालली आहे आणि हवाई दलाकडे लढाऊ विमानांच्या स्क्वॉड्रनची संख्या कमी होत आहे. एअर चीफ म्हणाले की, हवाई दलाला पुढील काही वर्षे दरवर्षी…

Read More