सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना इशारा:‘अजितदादांचं नाव वापरायचं आणि कुटुंबाला बदनाम करायचं, हे चालणार नाही’
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्री सोमेश्वर मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी त्यांनी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आणि बंडखोरी करत स्वतंत्र पॅनल उभे केलेले पुरुषोत्तम जगताप यांच्यावर थेट निशाणा साधला. अजित पवारांचे नाव आणि फोटो वापरून निवडणूक लढवू नये, तर स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवावी, असा…