Headlines

'आधीच मासिक पाळी, वॉशरूमलाही जाता आलं नाही':मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 9 तासांच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या अभिनेत्री धनश्री काडगांवकरचा धक्कादायक अनुभव

मुंबईसह राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका सोमवारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवाशांनाही बसला. मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगदा क्रमांक दोनच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूक अनेक तास ठप्प झाली. या प्रचंड वाहतूक कोंडीत अनेक प्रवाशांप्रमाणेच मराठी अभिनेत्री धनश्री काडगांवकरही तब्बल 9 तास अडकून पडली होती. या संपूर्ण प्रसंगाबाबत तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपला…

Read More

कुर्ला बस दुर्घटनेत मोठा खुलासा!:BEST बसमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता; RTO चा प्राथमिक अहवाल, चालकाच्या चुकीकडे बोट

मुंबईतील कुर्ला परिसरात घडलेल्या भीषण BEST बस दुर्घटनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का, याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. मात्र, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) प्राथमिक तपासात बसमध्ये कोणताही मोठा तांत्रिक दोष आढळून आलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अपघातामागे मानवी चूक (Human Error) हेच प्राथमिक कारण असू शकते,…

Read More

नवीन नागपूर बिझनेस डिस्ट्रिक्टसाठी मुद्रांक शुल्क माफ:गोदणी-लाडगावातील जमीन खरेदी सुकर, कनेक्टिव्हिटी वाढणार

हिंगणा तालुक्यातील गोदणी (रीठी) आणि लाडगाव (रीठी) येथे प्रस्तावित ‘नवीन नागपूर बिझनेस डिस्ट्रिक्ट’ प्रकल्पाला राज्य सरकारने गती दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी जमीन खरेदीवरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे जमीन संपादनाचा मार्ग सुकर होऊन प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग येणार आहे. नवीन बाह्य वळण रस्त्यामुळे या भागाची…

Read More

अमित शहा यांना पंतप्रधान व्हायचंय, त्यासाठीच खासदारांची फोडाफोडी:उद्या शहा मोदींविरोधातच बंड करतील, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देशाचे पंतप्रधान व्हायचे आहे आणि त्यासाठीच शिवसेना व टीएमसी मधील खासदार फोडण्याचे मोठे षडयंत्र त्यांनी रचले आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेली खासदारांची फोडाफोडी याच मोठ्या कटाचा भाग असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या षडयंत्रात सामील…

Read More

झाडे लावा, प्लास्टिक टाळाचा गजर; शाहू विचारांनी दुमदुमले केडगाव:महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात मिरवणूक; 110 गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप‎

राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती आणि सामाजिक न्याय दिन विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक समता, शिक्षण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर . यानिमित्त विद्यालयाच्या वतीने केडगाव ते शाहूनगर परिसरात भव्य जनजागृती मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थिनींनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि मावळ्यांची…

Read More

99% बाबा मुलींचे शोषण करतात- पप्पू यादव:म्हणाले- राजकारणात शोषणाशिवाय महिलांना प्रवेश नाही; एफबी लाईव्हनंतर तब्येत बिघडली

स्त्रियांची नेत्यांच्या बेडवरून न जाता राजकारणात एंट्री होत नाही. असे म्हणणारे पूर्णियाचे खासदार पप्पू यादव आजही आपल्या विधानावर ठाम आहेत. मंगळवारी त्यांनी फेसबुकवर लाईव्ह येऊन सांगितले, मी म्हटले आहे की स्त्रियांना राजकारणात येण्यासाठी शोषणातून जावे लागते. NEET ची मुलगी, मणिपूरची मुलगी, या सर्वांची लढाई मी लढत आहे. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एका मुलाने मुलीला मारले. कोणीही त्या…

Read More

हनुमाननगर गोळीबारप्रकरणी दोन्ही गँगच्या 8 गुंडांना बेड्या:दिवेकर-रांजणे गँगचा राडा; पोलिसांनी मुसक्या आवळल्या

हनुमाननगर चौकात हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या दिवेकर आणि रांजणे गँगच्या ८ गुंडांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी (१६ एप्रिल) रात्री झालेल्या या राड्यानंतर पोलिस त्यांच्या मागावर होते. या कारवाईत एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. सार्वजनिक कार्यक्रमातील जुन्या वादातून या दोन्ही गँगमध्ये धुसफूस सुरू होती. गुरुवारी दुपारी न्यायनगर भागात त्यांच्यात हाणामारी…

Read More

ग्रामीण अर्थव्यवस्थेला झळाळी देण्याचा गोसेवा आयोगाचा संकल्प:अकोल्यात 36 गोशाळांची नोंदणी; 24 संस्थांना शासन अनुदान‎

महाराष्ट्र सरकारने देशी गोवंशाचे महत्त्व ओळखून गायीला ‘राज्यमाता’ हा सर्वोच्च दर्जा बहाल केला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि राज्यभरातील देशी गोवंशाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी ‘महाराष्ट्र गोसेवा आयोग’ कार्यरत आहे. सद्यःस्थितीत आयोगाकडे राज्यभरातील ९८६ गोशाळांची नोंदणी झाली असून, देशी गोवंशाच्या माध्यमातून एक नवी आर्थिक व वैज्ञानिक क्रांती घडवण्याचा संकल्प आयोगाने केला आहे. अकोल्यात…

Read More

पुणे पोलिसांची ड्रग्ज तस्करांवर मोठी कारवाई:१९ जण अटकेत, ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे शहर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम राबवत १९ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ५८ लाख १८ हजार २५० रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार, १ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत परिमंडळ ७ अंतर्गत ही विशेष मोहीम राबवण्यात आली. परिमंडळ ७ मधील वाघोली, लोणीकंद,…

Read More

Tamil Nadu CM Stalin Tributes LTTE Prabhakaran; BJP Slams Congress

नवी दिल्ली30 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी बंदी घातलेल्या लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (LTTE) या संघटनेचे संस्थापक व्ही. प्रभाकरन यांना श्रद्धांजली वाहिल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपने यावर म्हटले की, काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना यामुळे कोणतीही अडचण येणार नाही, कारण ते सत्तेत सहभागी आहेत. काँग्रेस आता तामिळनाडूमध्ये विजय यांच्या…

Read More