Headlines

भंडारा-गोंदिया, नागपुरात विधान परिषदेसाठी 100% मतदान:नागपुरात एमआयएम, मुस्लिम लीग तटस्थ; 22 जूनला मतमोजणी

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवार, १८ जून रोजी विदर्भातील भंडारा-गोंदिया आणि नागपूर येथे मतदान पार पडले. दोन्ही मतदारसंघांत लोकप्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावल्याने तब्बल १०० टक्के मतदानाची नोंद झाली. विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या जागांवर यापूर्वीच अविरोध निवड झाल्याने, संपूर्ण राज्याचे लक्ष नागपूर आणि भंडारा-गोंदियाच्या लढतीकडे लागले होते. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात…

Read More

संपात ‘महसूल’चे 100 तर आरोग्य सेवेतील 70 टक्के कर्मचारी सहभागी:सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांचा संप‎

. जुनी पेन्शन योजना आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी, २१ एप्रिलपासून सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांनी संप पुकारला आहे. या संपात महसूल विभागाचे शंभर टक्के तर आरोग्य विभागाचे ७० टक्के कर्मचारी सहभागी झाले आहेत. परिणामी तहसील कार्यालयातून रोज दिले जाणारे दाखले आज मिळाले नाहीत. दुसरीकडे आरोग्य विभागातील परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्यामुळे तेथील…

Read More

श्याम मानव म्हणाले- धीरेंद्र शास्त्री पुन्हा आव्हान सोडून पळाले:'चमत्कारा'त अयशस्वी झाल्यास बाबागिरीचा धंदा बंद होईल; शास्त्री ठाम – दरबारात या

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या ‘दिव्य दरबार’ आणि त्यांच्या दाव्यांवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा पेटला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बाबांच्या चमत्कारांना पूर्णपणे नाकारत आता आव्हानाची रक्कम 30 लाखांवरून थेट 80 लाख रुपये केली आहे. समितीचे म्हणणे आहे की, ही लढाई रामकथेच्या विरोधात नाही, तर धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या अशा दाव्यांविरुद्ध आहे…

Read More

जयपूर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडक बंदोबस्त:'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनासाठी पोलीस सतर्क

नीट पेपरफुटीविरोधात जयपूरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर जयपूरमध्ये हल्ला झाला होता. या घटनेनंतर नागपुरात १६ जून रोजी होणाऱ्या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. सोमवारी जयपूरमधील शहीद स्मारकावर आंदोलन सुरू असताना गर्दीतील काही तरुणांनी अभिजित दिपके यांच्यावर…

Read More

गावठी कट्ट्यासह सराईत आरोपी जेरबंद:15 लाख 42 हजारांचा ‎मुद्देमाल जप्त‎

श्रीरामपूर येथील हरेगाव रोडवरील एस कॉर्नर परिसरातून गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथकाने अटक केली. पोलिसांनी त्याचेकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, मोबाईल आणि स्कॉर्पिओ वाहनासह एकूण १४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

कांदा-टोमॅटोचे दर वाढले, जूनमध्ये व्हेज थाळी 5% महाग:नॉनव्हेज-थाळीच्या किमतीतही वाढ, हवामानामुळे डाळींचे दर वाढतील

घरी तयार होणाऱ्या व्हेज थाळीची देशभरात सरासरी किंमत 5% वाढली आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलने आपल्या राईस रोटी रेट (RRR) मध्ये सांगितले की, जून 2026 मध्ये टोमॅटो, कांदा, खाद्यतेल आणि स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर महाग झाल्यामुळे थाळीची किंमत वाढली आहे. यामुळे बटाट्याच्या किमतीतील घसरणीचा परिणामही संपुष्टात आला. एजन्सीनुसार, चिकनचा पुरवठा कमी झाल्यामुळे नॉन-व्हेज थाळीची किंमतही जूनमध्ये 6%…

Read More

तहसीलमधील सेतू केंद्रातून विद्यार्थ्यांची लूट:सर्व्हर डाऊनचे कारण सांगून बाहेरील दुकानांकडे पाठवले जात असल्याचा गंभीर आरोप‎

शासनाने नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्रे व शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सांगोला येथील अधिकृत सेतू केंद्र अनेक वेळा रिकामे दिसत असून, विद्यार्थ्यां व नागरिक यांची खाजगी गाळ्यात कामे केली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. विशेषतः शाळा व महाविद्यालयीन प्रवेशासाठी…

Read More

नीलम गोऱ्हेंकडून रक्कम वाढवण्याच्या शिफारशीचे स्वागत:म्हणाल्या- 'लाडकी बहीण योजना' महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाची ताकद वाढवणारी

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाले असून त्यांच्या कुटुंबातील निर्णयक्षमतेत आणि क्रयशक्तीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या अभ्यास समितीनेही या योजनेबाबत सकारात्मक निरीक्षण नोंदवत महागाईच्या पार्श्वभूमीवर लाभार्थींना दिली जाणारी रक्कम वाढवण्याची शिफारस केली आहे. ही शिफारस राज्य सरकारने स्वीकारावी, अशी अपेक्षा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. नीलम गोऱ्हे म्हणाल्या…

Read More

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा कहर:नवापूर तालुक्यात वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले; कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?

नवापूर तालुक्यातील ढोंग परिसरात आज दुपारी निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. अचानक बदललेल्या हवामानामुळे जोरदार वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि आलेल्या चक्रीवादळाने या भागाला अक्षरशः झोडपून काढले. या नैसर्गिक आपत्तीत घरांचे पत्रे उडाल्याने अनेक संसार उघड्यावर आले असून, शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विद्युत खांब कोलमडल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे. ​दुपारच्या सुमारास…

Read More

Balbharati Math Textbook Errors 2026; Class 4 Mistakes

राज्यभरात शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासालाही वेग आला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. मात्र, याच दरम्यान ‘बालभारती’च्या ढिसाळ कारभाराचा एक अत्यंत धक्कादायक . विशेष बाब म्हणजे, हा गोंधळ केवळ एका माध्यमापुरता मर्यादित नसून मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांच्या पुस्तकांमध्ये मोठ्या प्रमाणावर…

Read More