Headlines

Mandana Karimi Leaves India After 16 Years, Says Doesnt Feel Like Home

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘बिग बॉस 9’ आणि ‘लॉकअप’ फेम अभिनेत्री मंदाना करीमीने अखेर भारत सोडला आहे. 16 वर्षे भारतात राहिल्यानंतर, तिने एक भावनिक व्हिडिओ शेअर करून देशाला निरोप दिला. मंदानाने भारताला आपले ‘दुसरे घर’ म्हटले होते, पण गेल्या काही काळापासून ती तिच्या सुरक्षिततेमुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे सतत वाद आणि चर्चेत होती. विमानतळावरून शेअर केला भावनिक…

Read More

महात्मा फुलेंना 'भारतरत्न'साठी खासदार वाघमारे यांचा विशेष आग्रह:द्विशताब्दी जयंती वर्षात सन्मान मिळावा, केंद्र सरकारकडे करणार मागणी

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ मरणोत्तर प्रदान करण्यात यावा, यासाठी केंद्र सरकारकडे विशेष आग्रह धरला जाईल, अशी ग्वाही खासदार ज्योती वाघमारे यांनी दिली. महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत त्या बोलत होत्या. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि कार्यकर्ते…

Read More

साताऱ्यात विद्रोही साहित्य संमेलनाची सांगता:अनेक ठराव मंजूर, पर्यायी सांस्कृतिक राजकारण स्त्रियांच्या खांद्यावरुन येणार – संभाजी भगत

ऐतिहासिक सातारा शहरात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२५ व्या जंयती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेलं १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन यशस्वीपणे पार पडलं. या संमेलनाच्या समरोप सत्रात संमेलनाचे अध्यक्ष लोकशाहीर संभाजी भगत, कॉ. सुबोध मोरे, ॲड. वर्षा देशपांडे, वाहरु सोनवणे, अविनाश कदम आणि कॉ. धनाजी गुरव यांची भाषणे झाली. आपल्याला या संमेलनानंतर काय करायचं आहे…

Read More

सुनेत्रा पवार अन् अक्षय कर्डिलेंचा विजय निश्चित- नवनाथ बन:म्हणाले- उबाठा गटाच्या कार्यालयावर काँग्रेसचा झेंडा; त्यांचे विचार पसरवणे हेच आता ठाकरेंचे काम

निवडणूक आयोगावर कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही, पण उबाठा गटाच्या कार्यालयावर काँग्रेसचा झेंडा दिसून येत आहे. उबाठा काँग्रेसची चाकरी करत आहे, त्यांची गुलामी करत आहे. उबाठा गटाच्या शिल्लक कार्यालयावर काँग्रेस झेंडा आणि तिथून काँग्रेस विचार पसरवण्याचे काम सुरू आहे, हेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचे धोरण झाले आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे….

Read More

राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय:नागपुरात 'सायक्लोट्रॉन प्रकल्प'; ग्रामीण पेयजल आणि ड्रोन निर्मितीच्या नवीन धोरणांना मंजुरी!

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीत वैद्यकीय क्षेत्र, ग्रामीण पाणीपुरवठा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींना दिलासा देणारे अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आले आहेत. नागपुरातील हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पासह ‘महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण २०२६’ आणि ‘ड्रोन-रोबोटिक्स’ निर्मितीला चालना देणारे स्वयंचलित प्रणाली धोरण जाहीर करण्यात आले आहे. नागपुरात…

Read More

वेरूळ लेणीच्या सौंदर्यात भर:सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लेणी क्र. 29 वरील धबधबा प्रवाहित; VIDEO

जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लेणी क्रमांक २९ वरील नैसर्गिक धबधबा पुन्हा जोरदारपणे प्रवाहित झाला आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे धबधबा सुरू झाल्याने लेणींचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. पावसाने उजळले लेणींचे सौंदर्य पावसाळ्यात डोंगररांगांमधून साचलेले पाणी लेणी क्रमांक 29 वरील जोगेश्वरी समोरील असलेले कुंडातून पाणी…

Read More

सह्याद्रीच्या कुशीत काजव्यांचा लखलखाट; भंडारदरा परिसरात पर्यटकांची विक्रमी गर्दी:विकेंडला १५ हजारांहून अधिक पर्यटकांची हजेरी; टोलनाक्यावर १ किमी लांब रांगा‎

विजय पोखरकर |अकोले सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात आणि भंडारदरा धरणाच्या रिंगरोड परिसरात निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या अखेरीस, म्हणजेच २१ मे पासून रात्रीच्या किर्र अंधारात वृक्षवल्लींवर हजारो काजवे चमचम करताना दिसत असून, अधिकृतपणे काजवा महोत्सव सुरू झाला आहे. २३ व २४ मे च्या विकेंडला हा स्वयंप्रकाशित जीवांचा अनोखा उत्सव पाहण्यासाठी…

Read More

लोकांना हेलपाटे मारायला लावू नका, कामे तात्काळ मार्गी लावा:माजी खासदार प्रसाद तनपुरे यांची राहुरी नगर पालिकेत झाडाझडती‎

प्रतिनिधी |राहुरी राहुरी नगरपरिषदेच्या सुस्त कारभारावर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी कडक शब्दांत ओढले ओढले. प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावा आणि जनतेची कामे विनाविलंब करा. लोकांना कामासाठी हेलपाटे मारायला लावले, तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी अधिकारी आणि नगरसेवकांना सुनावले. राहुरी नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षांच्या दालनासमोर मोकळ्या जागेत खुर्च्या टाकून तनपुरे यांनी बैठक…

Read More

महत्त्वपूर्ण घोषणा:राज्य एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5% वाढ, घरभाडे भत्त्याच्या थकबाकीसाठी 100 कोटींची तरतूद

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ५३ टक्क्यांवरून थेट ५८ टक्के करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी केली. याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याच्या थकबाकीसाठी १०० कोटी रुपयांची…

Read More

बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत मोठी कारवाई:अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 32 बालविवाह रोखले, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

राज्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने ‘स्पेशल फोर्स’च्या माध्यमातून मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळवले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. बाल विवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ नुसार १८ वर्षांखालील मुलगी व २१ वर्षांखालील मुलाचा विवाह लावणे हा दंडनीय गुन्हा असून, बाल विवाह…

Read More