![]()
मोहोळ शहरातील बागवान नगर आणि अहिल्यानगर परिसरात घरावरील ३३ केव्ही विद्युत वाहिनीचा शॉक लागून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि महिलांनी मंगळवारी (१६ एप्रिल) महावितरणच्या कार्यालयावर धडक देत सकाळपासून ठ
.
दि. १५ एप्रिल रोजी बागवान नगरमधील लक्ष्मी विजय आदलिंगे (वय ३२) या यात्रेनिमित्त घराच्या स्लॅबवर स्वच्छता करत होत्या. यावेळी वरून गेलेल्या ३३ केव्हीच्या उच्च दाबाच्या वाहिनीने त्यांना ओढून घेतले. विजेचा तीव्र झटका बसल्याने त्या गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत महिला आणि ज्येष्ठ नेते पद्माकर देशमुख, नगरसेवक चैतन्य देशमुख, सरफराज सय्यद, नाना मांडवे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जोपर्यंत लाईन बदलली जात नाही, तोपर्यंत उठणार नाही, अशी ठाम भूमिका घेण्यात आली. अखेर उपकार्यकारी अभियंता जी. जी. पटवेगार आणि शहर अभियंता नागेश खडतरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ३० एप्रिलपर्यंत लाईन शिफ्ट करण्याचे लेखी पत्र दिले. या आंदोलनात पद्माकर देशमुख, नाना मांडवे, सरफराज सय्यद, लखन ठोंबरे, बिलाल मोमीन, सचिन बनसोडे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “लोकवस्ती परिसरातील धोकादायक ३३ केव्ही लाईन ३० एप्रिलपर्यंत अन्य मार्गाने शिफ्ट केली जाईल, असे लेखी आश्वासन वीज वितरण कंपनीच्या वतीने देण्यात आले आहे.
महावितरणचे आश्वासन