Headlines

आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धेत भोपाळे प्रथम:काशीकर दुसरी, ढोमणे तिसरा; अमरावती विद्यापीठाच्या आदिवासी अध्यासन केंद्राचा उपक्रम




भगवान बिरसा मुंडा जयंती आणि जनजातीय गौरव दिनानिमित्त संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आदिवासी अध्यासन केंद्राने आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धा घेतली. स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. ज्ञानेश्वर भोपाळेने प्रथम, आहाना काशीकरने द्वितीय आणि आकाश ढोमणेने तृतीय क्रमांक मिळवला. भोपाळे महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कॉलेज ऑफ फार्मसीचा विद्यार्थी आहे. हे महाविद्यालय देगाव, वाशिम येथे आहे. काशीकर माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, शेगावची विद्यार्थिनी आहे. ढोमणे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाचा विद्यार्थी आहे. ‘आदिवासी अभिमान : इतिहास, ओळख आणि भविष्य’ हा स्पर्धेचा विषय होता. विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये निबंध लिहिण्याची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी भगवान बिरसा मुंडा यांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, आदिवासी वारसा आणि संस्कृती, ‘ओळख : मुळांचे जतन’ तसेच आधुनिक भारतातील आदिवासी विकास : संधी, आव्हाने आणि पुढील वाटचाल या विषयांपैकी एक निवडून निबंध लिहिले. प्रथम क्रमांकासाठी भोपाळेला अडीच हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी काशीकरला दीड हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ढोमणेला अकराशे रुपये देण्यात आले. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रेही देण्यात आली. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते आणि मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ. मनिषा कोडापे आणि विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *