Headlines

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या:वाकद येथे विषारी द्रव प्राशन करून उचलले टोकाचे पाऊल




कर्जबाजारीपणा, नापिकीच्या विवंचनेतून वाकद (ता. कन्नड) येथील शेतकरी कैलास सांडू चिकटे (६१) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २३ नोव्हेंबरला रात्री घडली. सोमवारी रात्री ८.३० वाजता त्यांनी विषारी द्रव प्राशन केले. प्रकृती खालावल्याने रात्री ९.३० वाजता त्यांना सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र उपचारादरम्यान रात्री १०.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता वाकद येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृत कैलास चिकटे यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रचे ४ लाख तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ६९ हजार रुपयांचे कर्ज होते. कर्जमाफीच्या यादीतही त्यांचे नाव आले नाही. त्यात पावसाअभावी पिके हातातून गेल्याने ते विवंचनेत होते. त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *