![]()
पाचोड परिसरात अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री धुमाकूळ घालत एकाच रात्री अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी पाचोड येथील काळे जेनेरिक मेडिकल स्टोअरचे शटर उचकटून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर आणि गल्ल्यातील तीन हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. याशिवाय शिवाजीनगर येथील शिक्षक कॉलनीतील अक्षय सोनवणे यांच्या घरासमोरील दुचाकी (एमएच २० २२१६) तसेच बागवान गल्लीतील बकऱ्याही चोरट्यांनी चोरून नेल्या. याच रात्री कोळी बोडखा शिवारातील गट नंबर ३८८ मधील शेतकरी पुंजाजी आश्रुजी वाहुळे यांच्या तीन मोटारींच्या केबलसह धोंडीबा ठोके, हानिफ शेख, रामनाथ ठोके, राधाकिसन मगरे, मैनाजी वाहुळे, प्रकाश मगरे, गुनाजी मगरे, राणूबा मगरे आणि अन्य तिघांच्या सौरऊर्जा पंपाच्या केबल वायर चोरीला गेल्या. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचे ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वर्षभरापासून केबल चोरीचे सत्र सुरूच असून, पाचोड पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. दिवसा रेकी, रात्री चोरी यंदा दुष्काळामुळे हाताला रोजगार नसल्याने अनेकजण चोरीचा मार्ग स्वीकारत आहेत. यात दिवसा दुचाकीवर तसेच पायी येऊन बंद घरे, पशुधन बांधलेल्या ठिकाणी रेकी केली जात असून, रात्रीच्या वेळी संधी साधून चोरी करण्यात येत आहे.
Source link
पाचोड परिसरात रात्रीतून मेडिकल फोडले:दुचाकीसह बकऱ्यांची चोरी, अज्ञात चोरट्यांनी कोळी बोडखा शिवारात मोटारीचे केबल केले लंपास