Headlines

कावनईत गोवर्धन पूजा:रुद्राभिषेक आणि 56 भोगांचा भक्तिमय सोहळा




तालुक्यातील कावनई येथे दीपावली पाडव्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर परिसरात गोवर्धन पूजा, रुद्राभिषेक, ५६ भोग आणि महाप्रसादाचा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. गोवर्धन पूजेच्या माध्यमातून निसर्ग, गोधन आणि कृषी संस्कृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी रुद्राभिषेकाचा धार्मिक विधीही श्रद्धापूर्वक करण्यात आला. भगवानांना विविध खाद्यपदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा असलेल्या ५६ भोग कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध उद्योगपती राधेश्याम अग्रवाल यांनी सहपरिवार गोवर्धन पूजा, रुद्राभिषेक आरती करत ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण केला. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महंत फलाहारी महाराज, कल्कीराम महाराज, मंदिराचे विश्वस्त कुलदीप चौधरी, राधेश्याम अग्रवाल, जे. के. मानवेडे, यांच्यासह भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक आणि कावनई येथील मंदिरात दरवर्षी सण-उत्सवांच्या निमित्ताने विविध धार्मिक उपक्रम राबविले जातात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *