Headlines

गरम पाण्याच्या पिशवीतून विजेचा धक्का, संगणक अभियंत्याचा मृत्यू:वडगाव शेरीत मानेखाली इलेक्ट्रिक पिशवी ठेवून झोपलेला रोहन कुबडी मृतावस्थेत आढळला




गरम पाण्याची इलेक्ट्रिक पिशवी मानेखाली ठेवून झोपलेल्या ३० वर्षीय संगणक अभियंता तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला. सदनिकेतून दुर्गंधी आल्याने रहिवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सदनिकेचा दरवाजा उघडला. तेव्हा संगणक अभियंता मृतावस्थेत सापडला. त्याच्या उशाखाली इलेक्ट्रिक गरम पाण्याची पिशवी सापडली. विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रोहन कुबडी (वय ३०) असे मृतावस्थेत सापडलेल्या संगणक अभियंता तरुणाचे नाव आहे. ‘रोहन हा एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला होता. तो अविवाहित होता. तीन महिन्यांपूर्वी वडगाव शेरीतील सोमनाथनगर भागात असलेल्या एका सोसायटीतील सदनिकेत त्याने भाडेतत्त्वावर घेतली. तो एकटाच राहत होता’, अशी माहिती चंदननगर पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून रोहन राहत असलेल्या सदनिकेचा दरवाजा बंद होता. सदनिकेतून तो बाहेर पडला नव्हता. तो राहत असलेल्या सदनिकेतून दुर्गंधी येत होती. सदनिका मालकाने रोहनच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. सदनिका मालकाला संशय आल्याने त्यांनी या बाबतची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. घर मालकाने दरवाजा उघडला. तेव्हा रोहन मृतावस्थेत पडला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा रोहनच्या मानेखाली गरम पाण्याची इलेक्ट्रिक पिशवी ठेवल्याचे दिसून आले. इलेक्ट्रिक पिशवीतून विजेचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागचे निश्चित कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *