Headlines

ज्ञानेश्वरी मुखोद्गत असणाऱ्या कृष्णा महाराजांकडे भगवानगडाचे मठाधिपतीपद:महंतपदाची सूत्रे हाती; गडाच्या 75 वर्षांच्या वाटचालीत नवा अध्याय



राज्यभर प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र भगवानगडाच्या चौथ्या उत्तराधिकारीपदी कृष्णा महाराज शास्त्री यांची दसऱ्याच्या मुहूर्तावर नियुक्ती करण्यात आली. गडाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत असताना भूतपूर्व मठाधिपती डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी कृष्णा

.

मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास भगवानबाबा ज्या गादीवर बसून भाविकांना भेटत असत त्या ठिकाणी हा सोहळा झाला. या वेळी गडाचे विश्वस्त अ‍ॅड. जगन्नाथ बटुळे, पांडुरंग आंधळे, प्रधान आचार्य नारायण स्वामी यांच्यासह भाविक उपस्थित होते. महंत डॉ. नामदेवशास्त्री म्हणाले, ‘सून आज सासू होत असल्याने माझे काम कमी होईल. यापुढे गडाचे बौद्धिक काम मी पाहीन, तर कृष्णा महाराज फिरून गडाचे कामकाज सांभाळतील. त्यामुळे गडाच्या विकासाला आणखी गती मिळेल. गेल्या २२ वर्षांत ऊसतोड मजूर आणि शेतकऱ्यांनी गडाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. येथे संत ज्ञानेश्वर माउलींचे भव्य मंदिर उभारले जात आहे. भविष्यात भगवानबाबांचे भव्य दगडी मंदिरही उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

परंपरांचे पालन करणे हा प्रयत्न असेल: कृष्णा महाराज

गडावर चालत आलेल्या प्रथा-परंपरांचे पालन करणे हा प्रयत्न असेल भगवानगडाच्या महंतपदी आपली निवड होईल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. वारकरी संप्रदायात ‘कृपा’ या शब्दाला मोठे महत्त्व आहे. गुरू डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांची माझ्यावर कृपा झाली ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, असे कृष्णा महाराज शास्त्री म्हणाले.

कृष्णा महाराज शास्त्री यांचा अल्प परिचय

मूळ गाव : तेलंगण राज्य भगवानगडाशी नाते : १७ वर्षांपूर्वी अध्यापनासाठी आगमन शिक्षण : एम.ए. विशेष : ज्ञानेश्वरी मुखोद्गत पूर्वीची जबाबदारी : एकनाथवाडी येथील निरंजन संस्थेचे महंत म्हणून तीन वर्षे कार्य नवीन जबाबदारी: भगवानगडाचे चौथे महंत मजूर आणि शेतकऱ्यांनी गडाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. येथे संत ज्ञानेश्वर माउलींचे भव्य मंदिर उभारले जात आहे. भविष्यात भगवानबाबांचे भव्य दगडी मंदिरही उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *