Headlines

देवगाव रंगारी ठाण्याच्या हद्दीत दारूविक्री; तीन ठिकाणी छापे:दारूच्या 47 बाटल्या जप्त; तीन जणांवर गुन्हे दाखल




देवगाव रंगारी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी दारूविक्रीविरोधात गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाया केल्या. या कारवायांमध्ये ५ हजार ३२० रुपये किंमतीच्या देशी दारूच्या ४७ बाटल्या जप्त करण्यात आल्या असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायंकाळी ६ वाजता ताडपिंपळगाव येथे छापा टाकून निलेश कैलास महेर (३३, रा. पिंपळगाव) याच्याकडून १,५६० रुपये किमतीच्या १३ बाटल्या जप्त केल्या. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता देवनाळा फाटा येथे कारवाई करत सुरेश लहू शेळके (वय ५०, रा. पिंपळगाव) याच्याकडून १,४४० रुपये किमतीच्या १२ बाटल्या जप्त केल्या. दुसऱ्या एका कारवाईत, देवगाव रंगारी पोलिसांच्या पथकाने सायंकाळी ७:३० वाजता गुप्त माहितीच्या आधारे औराळा येथे धाड टाकली. सपोनि सिद्धेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी सोनू गायकवाड व हवालदार वाल्मीक कांबळे यांनी किरण कमल नारायण जयस्वाल (रा. औराळा) याच्याकडून २२ बाटल्या जप्त केल्या. या तिन्ही कारवायांमध्ये ४,३२० ते ५,३२० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सर्व आरोपींवर देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *