Headlines

नवरात्रोत्सवात डीजेचा खर्च टाळत कृषीनगरात 16 सीसीटीव्ही:लासलगावच्या कृषीनगर मित्र मंडळाकडून देणगीतून एक किलोमीटर परिसरावर राहणार नजर‎




सण-उत्सवात डीजे व बँडसाठी जवळपास दीड लाख रुपयांपर्यंत खर्च केला जातो. मात्र ध्वनिप्रदूषणाचे गंभीर परिणाम लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींवर होत आहेत. या पार्श्वभूमीवर लासलगाव येथील कृषीनगर मित्र मंडळाने नवरात्रोत्सवात डीजेवरील अनावश्यक खर्च टाळून परिसराच्या सुरक्षेसाठी एक किमी परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. कृषीनगर परिसरातील प्रमुख मार्ग व संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, त्यामुळे चोरीच्या घटना, संशयास्पद हालचाली तसेच इतर गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. अशा उपक्रमांचे अनुकरण वाढल्यास उत्सव साजरे करण्यासोबतच परिसराच्या विकासालाही हातभार लागेल. या उपक्रमासाठी मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष ज्ञानेश्वर इंगळे, प्रतीक तिपायले, सागर थोरात तसेच मंडळाचे पदाधिकारी, सहकारी आणि महिला मंडळ परिश्रम घेत आहेत. कृषी नगर नवरात्रोत्सव मित्र मंडळाच्या वतीने यंदा परिसरात १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत यामुळे पोलिसांना देखील एक प्रकारे मोठी मदत या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे होणार आहे. भविष्यात आणखी समाजोपयोगी उपक्रम या मंडळातर्फे राबविल्या जाणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. कृषी नगर मित्र मंडळाच्या वतीने चालू वर्षी नवरात्रोत्सव साजरा करत असताना पर्यावरणाचे भान राखत परिसरात मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या वर्गणीतून वृक्षारोपण केले जाणार आहे. त्याचे जतन करण्याचा निर्धार मंडळाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. मुख्य रस्त्याच्या दुतर्फा ज्येष्ठ नागरिकांना सायंकाळी बसण्यासाठी बाकांची व्यवस्था यास देणगीतून केली जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *