Headlines

नांदेड:मुखेडमधील भाटू तांड्यात पक्क्या रस्त्याअभावी गर्भवतीला खाटेवरून नेले रुग्णालयात




मुखेडच्या भाटू तांड्यापर्यंत पक्का रस्ता नसल्याने एका गर्भवतीला २ किमी खाटेवरून रुग्णालयात न्यावे लागले. पावसामुळे रस्ता चिखलमय झाल्याने वाहन पोहोचले नाही. ग्रामस्थांनी तिला खाटेवरून मुख्य रस्त्यावर आणून मुखेडच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे तिने कन्येला जन्म दिला. दोघीही सुखरूप आहेत. अनिल राठोड यांची कन्या वर्षा पहिल्या बाळंतपणासाठी माहेर भाटू तांड्यावर आली होती. गुरुवारी प्रसूतीवेदना सुरू झाल्याने त्यांना अचानक रुग्णालयात न्यावे लागले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *