Headlines

नागापूरातील उद्योगांच्या विस्तारीकरणाला ब्रेक:आता सुपा एमआयडीसीचा नवा पर्याय, 225 हेक्टर जागेवर एमआयडीसीचे नाव, उताराही निघाला, पण पुढची प्रक्रिया थांबली‎



शहरातील नागापूर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी वडगाव गुप्ता येथील २२५ हेक्टर जागेवर एमआयडीसीचे नाव लागले आहे. तरीही, त्यातील तब्बल १२१ हेक्टर जागेबाबतचा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने विस्तारीकरण थांबले आहे. न्यायालयाने या जा

.

सुपा औद्योगिक क्षेत्रात तत्काळ उपलब्ध भूखंड, चौपदरी महामार्गाशी थेट कनेक्टिव्हिटी आणि पुणे-मुंबईशी जलद जोडणी यामुळे कंपन्यांना विस्तार करणे सोपे जात आहे. मोठे उद्योग बाहेर गेल्यास शहरातील रोजगारनिर्मिती थांबणार आहे. एल अँड टी, किर्लोस्कर, गरवारे यांसारख्या प्रमुख कंपन्यांवर अवलंबून असणाऱ्या शेकडो सूक्ष्म व लघुउद्योगांची साखळी विस्कळीत होण्याचा धोका आहे.

“९० टक्के जागा मिळाल्यानंतरच जागेचा विकास’ ^ वडगाव गुप्ताची जागा एमआयडीसीकडे आली आहे. मात्र, या जागेपैकी काही जागेचा विषय न्यायालयात गेला आहे. न्यायालयाने सध्या यावर ‘जैसे थे’ असे आदेश दिले आहेत. आम्ही न्यायालयात बाजू मांडत आहोत. जोपर्यंत ९० टक्के जागा मिळत नाही, तोपर्यंत एमआयडीसी ही जागा विकसित करू शकत नाही. त्यानंतर तेथे प्राथमिक सेवा-सुविधा दिल्या जातील. – गणेश राठोड, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, अहिल्यानगर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *