Headlines

नालासोपाऱ्यातील इमारतीला भीषण आग:2 महिलांचा जीव गुदमरुन मृत्यू, 20 ते 25 जणांची सुखरूप सुटका




पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे मंगळवारी रात्री एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून, अग्निशमन दल आणि पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत इमारतीत अडकलेल्या 15 जणांची सुखरूप सुटका केली आहे. नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील ‘इंपिरियल हाईट्स’ या इमारतीमध्ये मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही आग लागली. सुरुवातीला एका मजल्यावर लागलेल्या या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले आणि आगीच्या ज्वाळा इमारतीच्या आठव्या ते दहाव्या मजल्यापर्यंत पसरल्या. रात्रीची वेळ असल्याने बहुतांश नागरिक झोपेत होते. आगीची माहिती मिळताच रहिवाशांमध्ये एकच गोंधळ आणि घबराट उडाली. दोन महिलांचा दुर्दैवी अंत या भीषण आगीत आणि धुराच्या लोटात अडकून दोन महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. फाल्गुनी शाह (वय ५०) आणि अश्विनी पारकर (वय ५०) अशी या मृत महिलांची नावे आहेत. आगीची तीव्रता अधिक असल्याने त्यांना वेळेत इमारतीबाहेर पडता आले नाही, अशी प्राथमिक माहिती आहे. २० ते २५ जणांची सुखरूप सुटका घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी तातडीने बचावकार्य राबवत इमारतीत अडकलेल्या २५ रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. तसेच, काही नागरिक प्रसंगावधान राखून स्वतःहून इमारतीबाहेर पडण्यात यशस्वी ठरले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी रोहन मोरे यांनी सांगितले की, सुरुवातीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली. मात्र, घटनास्थळी पोहोचल्यानंतर वरच्या मजल्यांवर अनेक जण अडकल्याचे आणि आगीची तीव्रता अधिक असल्याचे अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे हे दलाचे पहिले प्राधान्य होते. यासाठी विशेष टर्नटेबल लॅडर (TTL) वाहन तैनात करण्यात आले. या शिडीच्या मदतीने इमारतीच्या बाहेरून आठ जणांची सुटका करण्यात आली, तर इमारतीच्या विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांसह एकूण सुमारे २५ ते ३० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती रोहन मोरे यांनी दिली. —————- हेही वाचा.. नालासोपाऱ्यात जिममध्ये तरुणींचे शोषण; 30वर व्हिडिओ जप्त, धर्मांतराचा दबाव:150 तरुणी अडकल्याचा संशय; मुख्य आरोपीसह तिघांवर गुन्हा नवरात्रोत्सवात गरबा खेळणाऱ्या महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे नालासोपारा येथील एका गंभीर गुन्हेगारी प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. पश्चिमेकडील छेडानगर परिसरातील ‘वेबकॉर्न जिम’मधील या प्रकारानंतर पोलिसांनी मुख्य संशयित आरिफ अयुब शेख याला अटक केली आहे. त्याच्या मोबाइलमध्ये तरुणींचे ३० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले आहेत. या प्रकरणात त्याची आई रुखसाना आणि नातेवाईक साहिल खान यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *