Headlines

नीलम गोऱ्हे यांनी बाळासाहेबांच्या आठवणी सांगितल्या:14व्या स्मृतिदिनी पुण्यात अभिवादन; शिवसैनिकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा संकल्प




पुण्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या १४व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी शिवसैनिकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला. गोऱ्हे यांनी सारसबागेतील बाळासाहेब ठाकरे कलादालनातील त्यांच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पुणे शहरातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात, बाळासाहेब भवन येथे त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली. बाळासाहेबांच्या निधनाचा दिवस आजही डोळ्यांसमोर उभा राहतो, अशी आठवण गोऱ्हे यांनी सांगितली. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र शोकाकुल झाला होता आणि अंत्ययात्रेला मोठा जनसमुदाय जमला होता, असे त्या म्हणाल्या. बाळासाहेबांचे पुण्यावर विशेष प्रेम होते. अलका टॉकीज परिसरात त्यांच्या अनेक सभा झाल्या. भेटीदरम्यान ते पुण्यातील घडामोडींची चौकशी करत आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यातील वास्तव्याच्या आठवणी सांगत, असेही गोऱ्हे यांनी सांगितले. बाळासाहेबांचा हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाचा विचार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुढे नेत असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. त्यांनी अयोध्येतील राममंदिराची उभारणी, कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय, श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न आणि समान नागरी कायद्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही गोऱ्हे यांनी लक्ष वेधले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मदतकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही,” या शिंदे यांच्या आश्वासनानुसार शिवसैनिकांनी विविध भागांत मदत पोहोचवल्याचे त्या म्हणाल्या. पुणे शहरातील संघटनात्मक कामाला गती देण्यासाठी शिवसेनेचे संपर्क नेते उदय सामंत लवकरच पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. शहरातील काही संघटनात्मक नियुक्त्यांसाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती गोऱ्हे यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे, संपर्कप्रमुख पूजा रावेकर, सहसंपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, सुधीर कुरुमकर, महेंद्र जोशी, नितीन पवार आणि मीरा तुपेरे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *