![]()
जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईचे सावट आता अधिकच गडद आणि चिंताजनक रूप धारण करत आहे. एरवी सप्टेंबरच्या अखेरीस धरणे, नद्या आणि विहिरी पाण्याने तुडुंब भरलेल्या असायला हव्यात, मात्र यंदा अनेक गावांमध्ये परिस्थिती अत्यंत विदारक आहे, जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून पाऊस उघडल्याने नदी नाले कोरडेठाकच राहिले आहे. त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. गावांगावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत चार तालुक्यांत १०४ टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. काही गावांत विहिर आणि पाण्याचे स्रोत अधिग्रहण केले आहे. काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असल्याने नव्याने टँकरचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयांकडे दाखल करत आहेत. पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले असून त्याच्या झळा नागरिकांना बसत आहेत. गंगापूर| तालुक्यात सध्या स्थितीत २६ गावात ३९ टँकर सुरू आहेत व चार गावचे नवीन टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव प्राप्त आहेत व १२ विहिरी अधिग्रहण करण्यात आलेल्या आहेत. फुलंब्री | तालुक्यात ६ गावांमध्ये ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून यामध्ये निधोना (२ टँकर), बोरगाव अर्ज, निमखेडा, गेवराई गुंगी, वाहेगाव आणि गेवराई पायगा या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव तालुक्यात अजून टँकर सुरू नाही. सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव बुद्रुक, धोत्रा व बाळापूर या तीन गावांनी टँकरची मागणी केली आहे अशी माहिती पंचायत समितीने दिली आहे. पैठण | पैठण तालुक्यात पाणीटंचाईचे सावट आता अधिकच गडद आणि चिंताजनक रूप धारण करत आहे. यंदा अनेक गावांमध्ये परिस्थिती विदारक आहे, तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. २५ गावे, वाड्या आणि तांड्यांची तहान भागवण्यासाठी ३७ टँकर मंजूर केले असून त्याद्वारे ६३,९३५ लोकांना टँकरने पुरवठा केला जात असल्याचे सहायक गटविकास अधिकारी राजेश कांबळे यांनी सांगितले. वैजापूर | दुष्काळाच्या झळा आता पिण्याच्या पाण्यापर्यंत पोहोचल्या असून, ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच वैजापूर तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. पंचायत समिती प्रशासनावर तब्बल २१ टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे.
Source link
पाणीटंचाई:ऑक्टोबरमध्येच पाणीटंचाईच्या झळा सुरू; चार तालुक्यांत 104 टँकरने पाणीपुरवठा