Headlines

महाराष्ट्रात वाघ वाढले; पण एकट्या चंद्रपुरात 3वर्षांत सर्वाधिक 91 बळी:जंगलातून होणारी ये-जा यामुळे वाघ आणि माणसांचा सामना जीवघेणा



वाघांच्या संवर्धनात महाराष्ट्राने ४४४ वाघांचा टप्पा गाठला; पण या यशाची दुसरी आणि चिंताजनक बाजू चंद्रपुरात माणसांच्या मृत्यूंच्या रूपाने समोर येत आहे. २०२३ ते २०२५ या तीन वर्षांत एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांत ९१ नागरिकांचा मृत्यू झाला,

.

इतर ५ प्रकल्पांत ३ वर्षांत केवळ १० ते १२ बळी वन विभागाच्या अधिकृत आकडेवारीचे विश्लेषण केले असता, मागील तीन वर्षांत एकट्या चंद्रपुरात वाघांच्या हल्ल्यात ९१ नागरिकांचा बळी गेला. याउलट, उर्वरित ५ व्याघ्र प्रकल्पांमध्ये ही एकूण संख्या अवघी १० ते १२ च्या आत सीमित राहिली आहे.

यामध्ये पेंचमध्ये ३ ते ४, मेळघाट व नवेगाव-नागझिऱ्यात प्रत्येकी २ ते ३, बोरमध्ये १ ते २, तर सह्याद्रीत एकाही बळीची नोंद झालेली नाही. इतर प्रकल्पांतील सलग कॉरिडॉर (भ्रमणमार्ग) आणि विखुरलेली वाघ-घनता मानवी जिवाचे रक्षण करण्यात सर्वात मोठे सुरक्षा कवच ठरत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

वाघ-बिबट्यांचे हल्ले: अडीचशेहून अधिक मृत्यू

राज्यामध्ये वाघ-बिबट्यांच्या हल्ल्यात २०२१-२४ मध्ये अडीचशेहून अधिक (८४, १०९, ६३) बळी गेले. यातील निम्म्याहून अधिक एकट्या चंद्रपुरात (२०२१-२५ मध्ये ४३, ५१, ९१) गेल्याचे दिसून येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक बळी का जात आहेत

‘टेरिटोरियल फाइट’: मर्यादित जंगल क्षेत्रामुळे नवीन वाघ हद्दीच्या लढाईतून मानवी वस्तीत. जंगलावरील अवलंबित्व: सरपण, महुआ, बांबू आणि तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी ग्रामस्थ जंगलात जातात. मानवाचा वाघांशी संपर्क. बाधित भ्रमणमार्ग: कोळसा खाणी आणि मानवी अतिक्रमणामुळे वाघांचे नैसर्गिक भ्रमणमार्ग तुटले.

वाघांची संख्या नव्हे, मानवी संपर्कही निर्णायक

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व राज्य वन विभागाच्या नोंदीनुसार राज्यात ४४४ वाघ आहेत. ताडोबा-अंधारीत (बफरसह) सर्वाधिक ११० हून अधिक वाघ आहेत. तसेच मेळघाटमध्ये ४५ ते ५०, पेंचमध्ये ६५ ते ७०, नवेगाव-नागझिरा व बोरमध्ये प्रत्येकी १५ ते २० आणि सह्याद्री प्रकल्पात १ ते २ वाघांचा वावर नोंदवला आहे.

एक्स्पर्ट व्ह्यू मंदार पिंगळे, उपसंचालक, सातपुडा फाउंडेशन

वाघांचे स्थानांतरण हाच शहाणपणाचा उपाय

“चंद्रपुरात वाघांची प्रचंड घनता, विस्कळीत भ्रमणमार्ग आणि जंगलावरील मानवी अवलंबित्व यामुळे ‘टेरिटोरियल फाइट’मधून वाघ मानवी वस्तीकडे वळत असून संघर्षात बळी वाढले आहेत. याउलट, मेळघाट-सह्याद्रीतील विखुरलेली घनता आणि पेंच-नागझिरा पट्ट्यातील सलग कॉरिडॉरमुळे इतर प्रकल्पांत अनपेक्षित चकमकी टळून मानवी हानी नियंत्रित राहिली आहे. यावर वाढलेल्या वाघांचे स्थानांतरण आणि लोकांचे जंगलावरील अवलंबित्व कमी करणे हाच शहाणपणाचा उपाय आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.