![]()
मुंबईतून महागडी मोटार चोरून पसार झालेल्या एका चोरट्याला पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ३० लाख रुपये किमतीची चोरीची मोटार जप्त करण्यात आली. अनीस अमीर शेख (वय २८, रा. भोंडवे वस्ती, रावेत, पिंपरी-चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. मुंबईतील आंबोली परिसरातून ही महागडी मोटार चोरीला गेली होती. या प्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरी केलेली मोटार घेऊन चोरटा पुण्यात आला असून, ती विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथक (एक) मधील पोलीस हवालदार रहीम शेख आणि पोलीस शिपाई मयूर भोकरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून ३० लाख रुपये किमतीची महागडी मोटार जप्त केली. ही कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश सागडे, सहायक निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, रणजीत फडतरे, रहीम शेख, बाबा दांगडे, सयाजी चव्हाण, अमोल आवाड, अतुल साळवे, बाला रफी शेख, राजेंद्र लांडगे, दुर्योधन गुरव, नितीन बोराटे, मयूर भोकरे आणि सुहास जगताप यांच्या पथकाने केली. भांडणे सोडविणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की रस्त्यावर असलेली भांडणे सोडविणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना हडपसरमधील मांजरी भागात घडली. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. या प्रकरणी अक्षय मोहन देशमुख (वय ३१, रा. देशमुख मळा, फुरसुंगी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी रस्त्यावर भांडणाचा प्रकार सुरू होता. महिला पोलीस कर्मचाऱ्याने भांडणात मध्यस्थी करुन देशमुख याला ताब्यात घेतले. भांडणे करू नका, असे सांगितले. त्यानंतर देशमुख महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी देशमुख याला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे तपास करत आहेत.
Source link
मुंबईत चोरी, पुण्यात बेड्या:महागडी मोटार चोरणारा अटकेत; पोलिसांनी 30 लाखांची गाडीही केली जप्त