Headlines

वैजापूर‎:नारंगी धरणात उडी घेत तरुणाची आत्महत्या




शहरातील हल्दी गल्ली भागातील तरुणाने नारंगी धरणात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. समीर शफिक शेख (२४) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समीर रविवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास नारंगी धरण परिसरात गेला. त्याने धरणाच्या पाण्यात उडी घेतल्याची माहिती मिळताच त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. रात्री अकराच्या सुमारास त्याला पाण्यातून बाहेर काढून तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. समीरने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *