Headlines

संभाजीनगरात तरुणाला मारहाण करताना वाचवण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा संभाजीनगरात खून:हरियाणाला पळून जाण्याच्या बेतात असलेले 5 हल्लेखोर जेरबंद




रांजणगाव शेणपुंजी येथे मध्यरात्री देवीच्या दर्शनाला गेलेल्या एका अल्पवयीन मुलास क्षुल्लक कारणावरून मारहाण सुरू झाली. त्याचा आरडाओरड ऐकून त्याला वाचवण्यास धावलेले वडील आणि भाऊ यांची चाकू व टिकाव खुपसून हत्या करण्यात आली. हरियाणाला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पाचही आरोपींना पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर बेड्या ठोकल्या . या प्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल केला. बाबासाहेब रामदास कीर्तिकर (४३), मुलगा निहाल (१७ रा, कृष्णानगर, रांजणगाव) असे मृत पिता-पुत्राचे नाव आहे. बाबासाहेब कीर्तिकर हे खासगी वाहनावर चालक आहेत. त्यांना कुणाल, निहाल व साहिल ही मुले आहेत. सोमवारी ( २० ऑक्टोबर) मध्यरात्री साहिल हा परिसरातील सार्वजनिक देवीच्या दर्शनासाठी गेला होता. देवीच्या मंडपालगतच आरोपी गयचंद कुटुंबाचे घर आहे. साहिल परतत असताना, ‘तू आमच्या घरासमोरच का थांबला?’ अशी कुरापत काढून राजेंद्र गयचंद व त्याचा मुलगा नागेशने साहिलला लाकडी दांड्याने मारहाण केली. आईनेच आरोपीच्या हाती चाकू दिला साहिलचा आरडाओरड ऐकून त्याचे वडील बाबासाहेब, भाऊ निहाल व कुणाल हे त्याला वाचवण्यासाठी धावून आले. ते आरोपींना समजावून सांगत असतानाच, आरोपी नागेशची आई शानोने घरातून चाकू आणून दिला, तर इतर आरोपींनी लाकडी दांडे व टिकावने मारहाण केली. नागेशने वडील बाबासाहेब व भाऊ निहाल यांच्यावर चाकूने वार केले. यात रक्तस्राव झाल्याने बाप-लेकाचा मृत्यू झाला, तर कुणाल व साहिल गंभीर जखमी झाले.हत्येनंतर सर्व आरोपी रेल्वेने हरियाणाला पळून जाण्याच्या बेतात पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातून ५ जणांना अटक केली. या प्रकरणी राजेंद्र गयचंद, मनोज गयचंद, नागेश गयचंद, मानसी गयचंद व शानो गयचंद या आरोपींना न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, जखमी झालेले कुणाल व साहिलवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सहा महिन्यांपूर्वीचा वाद हत्याकांडामागे जुना वादही कारण आहे. ६ महिन्यांपूर्वी बॅनर फाडल्याच्या कारणातून कीर्तिकर कुटुंबीय व आरोपींत वाद झाला होता. मूळचे हरियाणाचे हे कुटुंब मागील १०-१२ वर्षांपासून या परिसरात राहते. त्यांनी पाळलेला कुत्रा कुणावर भुंकला व त्या व्यक्तीने कुत्र्याला हाकलले, तरी हे कुटुंब त्या व्यक्तीला मारहाण करत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *