Headlines

'सरकार तयार असेल तर रोहित पवारांनी चर्चेला नक्की जावे':अनिल देशमुखांनी केले शशिकांत शिंदेंच्या भूमिकेचे समर्थन; दुष्काळावरही केले भाष्य




राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली 26 तारखेला सर्व जिल्हाध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीतील चर्चेनंतर राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन दिले जाणार असल्याची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच 4 तारखेच्या मोर्चापूर्वी सरकार चर्चेला तयार असेल तर रोहित पवारांनी नक्कीच चर्चेला जावे, असे समर्थनही त्यांनी यावेळी केले. रोहित पवार यांचा मोर्चा 4 तारखेला आहे आणि त्यापूर्वी ही बैठक होत आहे. काल शशिकांत शिंदे यांनी सांगितले की रोहित पवारांनी सरकार चर्चेला तयार आहे, तर त्यांनी चर्चेला जायला पाहिजे, यावर प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख म्हणाले की, बरोबर आहे, शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्टेटमेंट आले की सरकार तुमचे जे प्रश्न आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी तयार आहे. 26 तारखेला दुष्काळ परिस्थितीवर आढावा बैठक राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे 26 तारखेला दुष्काळ परिस्थितीच्या मुद्द्यावर बैठक घेणार आहेत. यावर अनिल देशमुख म्हणाले, 26 तारखेला जी बैठक होणार आहे, त्या संदर्भात दीड दोन महिन्यांपूर्वी शरद पवारांनी अशीच सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली होती. त्यात त्यावेळेसची दुष्काळची परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यात काय आहे, याबाबतीत त्यांनी संपूर्ण आढावा घेतला होता. आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीची बैठक, कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, सरकारला काय सूचना करायच्या, पिण्याच्या पाण्याची परिस्थिती कशी आहे, चाऱ्याची परिस्थिती कशी आहे, या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन मग त्या पद्धतीचे निवेदन राज्य शासनाला दिले जाईल की त्यांनी कोणत्या पद्धतीची पावले उचलायला पाहिजे. दुष्काळासंदर्भातील सूचना सरकारला दिल्या जाणार पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले, प्रत्येक जिल्ह्याला वेळ दिलेला आहे, या या वेळेला या जिल्ह्याची चर्चा होणार आहे, तिथल्या लोकांचे मत, तिथली परिस्थिती काय आहे दुष्काळाच्या परिस्थितीची, राज्य शासन यासंदर्भात व्यवस्थित काही पावले उचलते की नाही, त्यांना काही सूचना करायच्या का, या सर्व बाबींची चर्चा त्या ठिकाणी होईल. तसेच त्या पद्धतीने पक्षाकडून राज्य शासनाला पत्र दिले जाईल, अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे. पक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या दुष्काळाबाबतचे निवेदन देण्यात येईल का? यावर उत्तर देताना अनिल देशमुख म्हणाले, आपल्याला कल्पना आहे की मागच्या वेळेला जेव्हा बैठक घेण्यात आली होती, तेव्हा पवार साहेबांनी सविस्तर असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले होते की कशा पद्धतीने राज्य शासनाने याबाबतीत लक्ष दिले पाहिजे. आणि त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले होते की पवार साहेबांचे पत्र आले असून आम्ही त्या पद्धतीने काम करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे. ही देखील बातमी वाचा.. रोहित पवारांना अजितदादांची जागा घेण्याची घाई झालीय:सतेज पाटलांना बहुमत असूनही गोकुळचा चेअरमन करता न आल्याची खंत; हसन मुश्रीफ यांचा चौफेर निशाणा राज्याच्या राजकारणात सध्या गाजत असलेल्या कोयना पाणीवाटप, मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन), रोहित पवारांची स्वपक्षातील कोंडी आणि गोकुळ दूध संघातील वकिलांच्या 80 लाख रुपयांच्या फीच्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी (24 नोव्हेंबर) कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत अत्यंत रोखठोक भूमिका मांडली. “रोहित पवारांना लवकरात लवकर मोठे होण्याची आणि अजितदादांची जागा घेण्याची घाई झाली आहे. पक्षाला विश्वासात न घेता ते आक्रमक आंदोलने करत असल्यानेच शरद पवार गटाने त्यांच्या ट्रॅक्टर मोर्चापासून फारकत घेतली आहे,” असा टोला मुश्रीफ यांनी लगावला. तसेच, कोयनेचे वीजनिर्मितीनंतर समुद्राला वाहून जाणारे पाणी मुंबईला देण्यास विरोध करण्याची गरज नाही, मात्र वारणेचे पाणी पश्चिम महाराष्ट्र अजिबात नेऊ देणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *