![]()
जेजुरीच्या खंडोबाचे प्रतिरूप मानल्या जाणाऱ्या आणि वर्षाकाठी १२ ते १५ लाख भाविक येणाऱ्या सातारा गावातील श्रीक्षेत्र खंडोबा मंदिराला राज्य शासनाचा ‘ब’ दर्जाच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या बुधवारी (४ नोव्हेंबर) झ
.
सातारा गावातील हेमाडपंती स्थापत्यशैलीतील या मंदिराच्या गर्भगृहात कोरीव काम आहे. घोड्यावर स्वार असलेली खंडोबाची स्वयंभू मूर्ती आणि हातातील खंडा (तलवार) हे मंदिराचे वैशिष्ट्य आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी १७६६ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांकडे या मंदिराला ‘ब’ दर्जा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शासनाने निकष आणि ना हरकत प्रमाणपत्रांसह प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने पोलिस, वन आणि नगररचना विभागाकडून प्रमाणपत्रे मिळवून हा प्रस्ताव तयार केला. पोलिस विभागाच्या अहवालानुसार येथे बंदोबस्त असतो, तर वन विभागाच्या मते मंदिर परिसरात कोणतेही राखीव वनक्षेत्र नाही.
सुविधांचा होणार विस्तार
सध्या मंदिर परिसरात पोहोच रस्ता, पार्किंग, शौचालये आणि पथदिव्यांची व्यवस्था आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम आणि महापालिकेकडून रस्ते व जलनिस्सारणाचे काम सुरू आहे. मात्र, ‘ब’ दर्जा मिळाल्यास शासनाकडून निधी उपलब्ध होईल आणि मंदिराच्या पायाभूत विकासाला गती मिळेल.