मोकाट जनावरांमुळे पाथर्डी बाजारामध्ये नागरिकांना त्रास:शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा करावा लागतोय सामना
शहरातील आठवडे बाजार हा नागरिकांसाठी आहे की मोकाट जनावरांसाठी, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. बुधवारी भरलेल्या आठवडे बाजारात मोकाट जनावरांच्या झुंजीत बाजारासाठी आलेल्या महिलेसह तिच्या कडेवर असलेले चिमुकले बाळ गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारात माणसांपेक्षा मोकाट जनावरांचीच संख्या अधिक असल्याचे चित्र दिसत आहे. भाजीपाला…