अकोट वन्यजीव विभागात 23 वाघ, 8 बिबट्यांचे दर्शन:बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात 58 वन्यप्रेमींनी मचाणीवर बसून घेतला आनंद
८१ हजार १९२ हेक्टरवर पसरलेल्या आणि वनश्रीमंत असलेल्या अकोट वन्यजीव विभागातील पाच परिक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात झालेल्या प्राणी गणनेत धारगड परिक्षेत्रात सर्वाधिक वाघ, तर सोनाळा परिक्षेत्रात बिबट्यांचे निसर्गप्रेमींना दर्शन झाले असल्याची माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षकांनी सोमवारी दिली. बुद्ध पौर्णिमेला शुभ्र प्रकाशात “निसर्ग अनुभव’ कार्यक्रम पार पडला होता. यामध्ये राज्यासह परराज्यातून ५८ पर्यटकांनी सहभाग…