भरधाव हायवाची दुचाकीला धडक:तरुणाचा जागीच मृत्यू, शेंद्रा एमआयडीसीतील घटना, चालक फरार
शेंद्रा एमआयडीसी परिसरात भरधाव हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी चारच्या सुमारास घडली. अपघातानंतर हायवा चालक वाहन सोडून फरार झाला असून, या प्रकरणी चिकलठाणा ठाण्यात गुन्हा नोंद आहे. सौरभ गोविंद तांबे (वय २२, रा. शेंद्रा कामगार वसाहत) असे मृताचे नाव आहे. सौरभ हा आपल्या दुचाकीवरून (एमएच २० ५४०८)…