Headlines

आषाढी यात्रा:इसबावीतील पुलाचे अर्धवट काम पाहून संतप्त पालकमंत्र्यांच्या कारवाईच्या सूचना

“आषाढी यात्रा तोंडावर आलेली असताना इसबावी येथील पुलाचे काम अद्यापही अपूर्ण कसे? ठेकेदाराकडे पुरेशी यंत्रसामग्री का नाही? अशा शब्दांत तीव्र संताप व्यक्त करत “संबंधित ठेकेदारावर तत्काळ गुन्हा दाखल करा,” असे कडक आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी पाहणीवेळी प्रशासनाला दिले. पालकमंत्र्यांनी स्वतः जागेवरूनच थेट दुसऱ्या ठेकेदाराला फोन लावला चालू ठेकेदारावर कारवाई करण्याचे सूचना प्रशासनाला दिल्या….

Read More

…तर 2022 मध्ये 200 कोटींची ऑफर मी नाकारली असती का‎:मी मंत्रिपदासाठी गेलो नाही, धाराशिवचा मागासलेपणाचा डाग पुसायचा आहे‎- ओमराजे

मंत्रीपदाची अपेक्षा ठेवून किंवा अट्टहास करून शिंदेसेनेत प्रवेश केलेला नाही. माझ्यासाठी मंत्रीपदापेक्षा धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनतेची कामे आणि विकास अधिक महत्त्वाचा आहे, अशा शब्दांत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. धाराशिव जिल्ह्याचा मागासलेपणाचा डाग पुसून टाकण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची मदत मिळवणे हेच मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. खा. ओमराजे म्हणाले, धाराशिव…

Read More

घंटागाडी खरेदी, बोअरवेल दुरुस्तीला मंजुरी:आपत्तीसाठी नोडल अधिकारी, नगरसेवक पतीच्या सभागृहातील प्रवेशाने सभापती संतप्त‎

मनपाच्या सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शहरातील विविध विकासकामांना व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. मात्र, ही सभा प्रशासनाचा ढिसाळ कारभार, कंत्राटदारांची मनमानी, बाजार फी वसुलीतील उदासीनता व महापालिकेच्या आर्थिक नुकसानीच्या मुद्द्यांवरून वादळी ठरली. सदस्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत तीव्र संताप व्यक्त केला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून कचरा संकलनासाठी नव्या…

Read More

टाळमृदंगाच्या गजरात सदगुरु संत वासुदेव महाराज पालखीचे आगमन:वासुदेव नामाच्या गजरात दुमदुमली नगरी; पालखीचे स्वागत, पूजन‎

टाळ-मृदंगाच्या गजरात अकोला येथून सद्गुरू श्री संत वासुदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे राजेश्वरनगरीत आगमन झाले. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या या पालखी सोहळ्याचे भाविकांनी स्वागत केले. दर्शन घेतले. . जठार पेठ परिसरात भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक वातावरणाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. श्री वासुदेव महाराज पालखीचे जठार पेठ येथे आगमन होताच भक्तांनी उत्साहात स्वागत केले. विधिवत पूजन…

Read More

समाधानकारक पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या:शेतकरी तयारीत व्यस्त, मूर्तिजापूर तालुक्यात तुरळक पावसावर कपाशीची टोचणी सुरू‎

मृग नक्षत्र संपले तरी तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. दोन दिवस आलेल्या पावसाने सरींमुळे शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली असली तरी पेरणीसाठी आवश्यक ओलावा जमिनीत निर्माण झालेला नाही. परिणामी अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग देत आहेत.शेतांमध्ये ट्रॅक्टर तसेच बैलजोडीच्या साहाय्याने वखरणी,पट्टीपास, सऱ्या पाडणे, बांध दुरुस्ती आदी…

Read More

सरकारने पुन्हा शब्द फिरवला:शेतकरी आता गप्प बसणार नाहीत, कर्जमाफीवरून रविकांत तुपकरांचा इशारा

“राज्य सरकारने ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता पुन्हा एकदा तारीख पुढे ढकलून सरकारने शेतकऱ्यांच्या विश्वासाशी मोठा घात केला आहे. सरकारने ही चालढकल तातडीने थांबवावी, शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नये, अन्यथा शेतकरी आता गप्प बसणार नाही,” असा थेट आणि कडक इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे….

Read More

टीईटी पेपरफुटीवरून काँग्रेस आक्रमक:शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे, राजीनाम्याची मागणी

राज्यात टीईटी (TET) परीक्षेचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट असतानाच, आता या प्रकरणाचे थेट पडसाद रस्त्यावर उमटू लागले आहेत. टीईटी पेपरफुटीच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत तो अडवण्याचा प्रयत्न केला. “भ्रष्ट सरकारचा निषेध असो”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा” अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. या आक्रमक…

Read More

जिल्हा परिषदेच्या 137 शाळा जर्जर, तर 230 वर्गखोल्या धोकादायक यादीमध्ये:उन्हाळ्याची सुटी संपली तरी इमारतींची दुरवस्था कायमच‎

. शिक्षण विभागाने बऱ्यापैकी गाजावाजा करीत मंगळवारी ३० जून रोजी निवडक शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे समारंभ आयोजित केले आहेत. परंतु व्यापक प्रमाणातील वास्तविक चित्र मात्र काही वेगळेच आहे. ग्रामीण तसेच शहरी भागांतील अनेक शासकीय आणि जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती अत्यंत नादुरुस्त व जर्जर अवस्थेत पोहोचल्या आहेत. अनेक ठिकाणी वर्गांची छते गळत असून, भिंतींना मोठे तडे गेले आहेत….

Read More

14 महिने पूर्ण होण्यापूर्वीच भाजपचे शहराध्यक्ष बदलले:आ. अडसड ग्रामीण (मोर्शी), तर गुडदे शहराध्यक्षपदी‎

सुमारे १४ महिन्यांपूर्वी (मे २०२५) भारतीय जनता पक्षाने शहराध्यक्षपदी डॉ. नितीन धांडे, तर ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्षपदी रविराज देशमुख यांची नियुक्ती केली होती. मात्र नियुक्तीपासून १४ महिने पूर्ण होण्यापूर्वीच पक्षाने त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांची ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्षपदी, तर नितीन गुडधे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात…

Read More

दमदार पावसाच्या प्रतीक्षेत संत्रा, मोसंबी उत्पादक:कलमा तयार, 365 शासनमान्य नर्सरी, समाधानकारक दर मिळण्याची अपेक्षा‎

सातपुड्याच्या पायथ्याशी आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट परिसरात संत्रा, मोसंबी व लिंबूची कलमे विक्रीसाठी तयार झाली आहेत. आता लागवडीसाठी अनुकूल आणि दमदार पावसाची प्रतीक्षा उत्पादक शेतकरी करत आहेत. पाऊस चांगला झाल्यानंतर राज्यासह राजस्थान, मध्यप्रदेश आणि इतर राज्यांतील शेतकरी येथे मोठ्या प्रमाणात कलम खरेदीसाठी येतात. शेंदूरजनाघाट परिसर संत्रा कलम उत्पादनासाठी देशभरात ओळखला जातो. तिवसाघाट, सातनूर,…

Read More