जिल्हा परिषदेच्या 67 शिक्षकांच्या खांद्यावर केंद्रप्रमुखांची जबाबदारी
शिक्षकांमधून निवडावयाच्या केंद्रप्रमुख पदाची प्रक्रिया नुकतीच पार पडली. या प्रक्रियेंतर्गत जिल्हा परिषदेतील ६७ शिक्षकांच्या खांद्यावर नवी जबाबदारी टाकण्यात आली आहे. सदर प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिका तसेच संबंधित सर्व न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पार पाडण्यात आली. या अनुषंगाने पात्र जिल्हा सेवा शैक्षणिक (वर्ग-३) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक व प्रशिक्षित शिक्षक संवर्गातील उमेदवारांना…